• Download App
    ऑक्सिजनअभावी झालेले मृत्यू लपविण्यासाठी आयसीएमआरची गाईडलाईन, त्यामुळेच खऱ्या मृत्यूंची संख्या पुढे आली नसल्याचा आरोप|ICMR's guideline to cover oxygen-deficient deaths, alleging that the actual number of deaths did not come forward

    ऑक्सिजनअभावी झालेले मृत्यू लपविण्यासाठी आयसीएमआरची गाईडलाईन, त्यामुळेच खऱ्या मृत्यूंची संख्या पुढे आली नसल्याचा आरोप

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू झाला नाही असे आरोग्य राज्य मंत्री डॉ. भारती पवार यांनी राज्यसभेत सांगितले आहे.ICMR’s guideline to cover oxygen-deficient deaths, alleging that the actual number of deaths did not come forward

    यावरून गदारोळ माजला असून इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) मार्गदर्शक सूचनांमुळेच राज्यांनी ऑक्सिजनअभावी झालेले मृत्यू नोंदविले नाही असा आरोप ऑर्गनाइज्ड मेडिसिन अ‍ॅकॅडमिक गिल्डने(ओएमएजी) केला आहे.



    ओएमजीचे सरचिटणीस डॉ. ईश्वर गिलाडा म्हणाले, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) – नॅशनल सेंटर फॉर डिसीज इनफॉरमॅटिक्स यांनी कोरोनाच्या मृत्यूच्या कारणांबाबत एक मार्गदर्शक सूचना दिली आहे.

    यामध्ये श्वासोश्वास बंद झाल्यामुळे, श्वसनक्रिया बंद होणे याचा मृत्यूच्या कारणांमध्ये उल्लेख करू नये असे सांगण्यात आले होते. डॉक्टर म्हणून आम्हाला नेहमीच मोड आॅफ डायनिंगचा म्हणजे मृत्यूच्या कारणाचा उल्लेख करण्याचे टाळण्यासाठी सांगितले गेले आहे.

    त्यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनअभावी अनेक मृत्यू झाले. मात्र, राज्य सरकारकडून त्याची नोंद झाली नाही. हिच माहिती केंद्र सरकारकडे पाठविण्यात आली. त्यामुळे सरकारने ऑक्सिजनच्या अभावी एकही मृत्यू झाला नाही असा दावा केला आहे.

    ऑर्गनाइज्ड मेडिसिन अ‍ॅकॅडमिक गिल्डमध्ये(ओएमएजी) भारतातील सुमारे तीन लाख पदव्युत्तर पदवी घेतलेल्य डॉक्टरांचा समावेश आहे.ओएमजीच्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, प्रसिद्धी पत्रकात असे म्हटले आहे

    मृत्यूचे मूलभूत कारण डॉक्टरांना मृत्यूचे कारण (एमसीसीडी) फॉर्ममध्ये नोंदवावे लागते. ते रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया (ओआरजीआय) येथे सादर केले जाते. ओआरजीआय डेटा रेकॉर्ड करतो. परंतु तो बदलू शकत नाही. ज्याप्रमाणे पॅरासिटामोलच्या अभावामुळे किंवा स्टिरॉइडच्या अभावामुळे मृत्यू झाला हे कारण दिले जात नाही तसेच ऑक्सिजनच्या अभावी मृत्यू झाला हे देखील देत नाहीत.

    आंतरराष्ट्रीय पातळीवरच हे कारण नोंदविण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे रुग्णाच्या मृत्यूचे खरे कारण हे शवविच्छेदन अहवालातूनच समजते. मात्र, कोरोनाच्या रुग्णांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मृतदेहाची तातडीने विल्हेवाट लावावी अशा आयसीएमआरच्या सूचना होत्या. त्यामुळे कोरोना रुग्णांचे शवविच्छेदन करण्यातच आले नाही. त्यामुळे ऑक्सिजनअभावी मृत्यू झालेल्या रुग्रांची संख्या समोर आलीच नाही.

    राज्यसभेत निवेदन देताना केंद्राने सांगितले होते की, आरोग्य हा राज्य सरकारचा विषय आहे. तपशीलवार मार्गदर्शक सूचनांनुसार करोना रुग्णसंख्या आणि मृत्यूची आकडेवारी नियमितपणे सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांद्वारे दिली जाते.

    केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मृत्यूची नोंद करण्यासाठी सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केली आहेत. त्यानुसार सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश नियमितपणे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला माहिती देतात. त्यामुळे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांपासून स्वतंत्रपणे ऑक्सिजन नसल्यामुळे मृत्यूची कोणतीही आकडेवारी आलेली नाही.

    ICMR’s guideline to cover oxygen-deficient deaths, alleging that the actual number of deaths did not come forward

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य