विशेष प्रतिनिधी
नाशिक : क्रिकेट विश्वचषकावर कोरून नाव, भारतीय महिलांनी रचला इतिहास!!, ही घटना 3 नोव्हेंबर 2025 रोजी नवी मुंबई च्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर घडली. 1973 मध्ये महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धा सुरू झाल्यावर पहिल्यांदाच भारतीय महिलांना 2025 मध्ये विश्वचषकावर नाव कोरता आले. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय वाघिणींनी दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक भारताकडे खेचून आणायचा पराक्रम केला. भारतीय महिला संघाने क्रिकेट विश्वचषकातली ऑस्ट्रेलियाची मक्तेदारी मोडून काढली. कारण पहिल्यांदाच अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया किंवा इंग्लंड या दोन्ही संघांचा समावेश नव्हता. ICC Women’s World Cup Final
अंतिम सामन्यात भारताने 48 षटकांमध्ये 298 धावांचा डोंगर उभारला. तो दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाला पार करणे अवघड ठरले. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागात भारतीय महिला दक्षिण आफ्रिकेच्या महिलांना भारी ठरल्या. दक्षिण आफ्रिकेचा संघ 45.3 षटकांमध्ये 246 धावांवर गुंडाळला गेला.
ऑस्ट्रेलियाचा नक्षा उतरवला
पण अंतिम फेरीपर्यंतचा भारताचा प्रवास सोपा नव्हता भारताला ऑस्ट्रेलिया कडून साखळी सामन्यात पराभव पत्करावा लागला होता, पण उपांत्य सामन्यामध्ये भारतीय महिलांनी प्रचंड पराक्रम करून ऑस्ट्रेलियाची 338 धावसंख्या असताना सुद्धा ती ओलांडून ऑस्ट्रेलिया महिला संघाला हरवून दाखविले होते. त्यानंतर भारतीय महिलांचा आत्मविश्वास प्रचंड वाढला सात वेळा वर्ल्ड चॅम्पियन बनलेल्या ऑस्ट्रेलियाला 338 धावसंख्या उभारून सुद्धा आपण हरवू शकतो हे भारतीय महिलांच्या लक्षात आल्यावर त्यांचा आत्मविश्वास दुणावून त्याचे पडसाद अंतिम सामन्यात उमटले. अंतिम सामन्यात भारताने 298 ही आव्हानात्मक धावसंख्या उभारून दक्षिण आफ्रिकेला 246 धावांमध्ये गुंडाळले.
आत्तापर्यंत ऑस्ट्रेलिया सात वेळा वर्ल्ड चॅम्पियन राहिली त्यानंतर इंग्लंड आणि न्यूझीलंड वर्ल्ड चॅम्पियन होते त्यांच्या पाठोपाठ आता भारताचा महिला संघ सुद्धा वर्ल्ड चॅम्पियन झाला आहे.
2025 च्या विश्वचषक सामन्यांमध्ये भारतीय संघ पूर्ण फॉर्म मध्ये होता. स्मृती मंधना, जेमीमा रॉड्रींक्स, हरमनप्रीत कौर, दीप्ती शर्मा, शेफाली वर्मा या जबरदस्त चमकल्या. दीप्ती शर्मा आणि शेफाली वर्मा यांनी तर अंतिम सामन्यात बॅट आणि बॉल या दोन्हींनी चमक दाखवली. दीप्ती शर्मा वुमन ऑफ द मॅच ठरली. कारण तिने 58 धावा करण्याबरोबरच चार गडी बाद केले.
ICC Women’s World Cup Final | India defeat South Africa by 52 runs.
महत्वाच्या बातम्या
- Cold Allergy : सर्दी आणि अॅलर्जीच्या औषधांचे नमुने फेल, विक्रीवर बंदी; YL फार्माच्या लेव्होसेटीरिझिन-डायहायड्रोक्लोराइड टॅब्लेटचा दर्जा आढळला निकृष्ट
- पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांसकट ठाकरे बंधू मुंबईत सत्याच्या मोर्चात; पण देवेंद्र फडणवीस मात्र बिहार निवडणुकीच्या प्रचारात!!
- Stray Dogs : भटक्या कुत्र्यांवर SCने पुन्हा सरकारांकडून उत्तर मागितले; म्हटले- सर्व मुख्य सचिव झोपलेत, येऊन सांगा की प्रतिज्ञापत्र का दिले नाही!
- Home Minister : देशातील 1466 वीरांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक; पहलगाम हल्ल्याच्या सूत्रधाराला ठार मारणाऱ्या 20 पोलिसांना सन्मानित केले जाईल