बार्बाडोसमधील सामन्यादरम्यान पावसाची दाट शक्यता आहे
विशेष प्रतिनिधी
बार्बाडोस : T-20 विश्वचषक 2024 चा अंतिम सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार आहे. हा सामना बार्बाडोस येथे थोडाच वेळात सुरू होणार आहे. भारतीय संघ तिसऱ्यांदा T-20 विश्वचषकाचा अंतिम सामना खेळण्यासाठी आला आहे. तर दक्षिण आफ्रिकेने प्रथमच हा टप्पा गाठला आहे. अशा स्थितीत हा हाय व्होल्टेज फायनल ठरणार आहे. पण, बार्बाडोसमधील सामन्यादरम्यान पावसाची दाट शक्यता आहे. आता प्रश्न असा पडतो की अंतिम सामना जर पावसाचा सावट असेल तर कोणता संघ ट्रॉफी जिंकेल?ICC Rule For Final If India-South Africa final is interrupted by rain then who will be the winner
विश्वचषक 2024 चा अंतिम सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार आहे. या सामन्यासाठी बार्बाडोसच्या हवामानाचा अंदाज पाहिल्यास पावसाची दाट शक्यता आहे. 29 जून रोजी सकाळी 74 टक्के आणि रात्री 42 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत पावसाचा या सामन्यावर परिणाम होऊ शकतो.
मात्र, चांगली गोष्ट म्हणजे आयसीसीने अंतिम सामन्यासाठी 30 जून हा राखीव दिवस ठेवला आहे. जर भारत-दक्षिण आफ्रिका सामना 29 जून रोजी होऊ शकला नाही, तर हा सामना 30 जून रोजी होऊ शकतो.
कोण जिंकणार ट्रॉफी?
आता 29 जून आणि त्यानंतर 30 जून म्हणजेच राखीव दिवशी अंतिम सामन्यात पाऊस पडत राहिला तर चॅम्पियन कोण होणार? जर हा प्रश्न येत असेल आणि भारत आणि दक्षिण आफ्रिका सामना पावसामुळे रद्द झाला, तर आयसीसीच्या नियमांनुसार दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित केले जाईल. जर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्याचा निकाल पावसामुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे जाहीर झाला नाही, तर दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित केले जाईल.
ICC Rule For Final If India-South Africa final is interrupted by rain then who will be the winner
महत्वाच्या बातम्या
- ICC T20 World Cup : इंग्लडला 68 धावांनी पराभूत करत भारताची विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात धडक!
- पेपरफुटी वरून विरोधकांचा दोन्ही सरकारांवर हल्लाबोल, पण महाराष्ट्रात ठाकरे – पवार सरकारच्या काळात झाल्या तरी किती पेपरफुटी??
- गुंडांशी संबंध नकोत, म्हणून अजितदादांनी भरली होती तंबी, पण त्यांच्याच कार्यकर्त्यांनी ती खुंटीला टांगली!!
- केजरीवाल सरकारला आणखी एक मोठा झटका, उपराज्यपालांनी ‘ही’ समिती केली बरखास्त