विशेष प्रतिनिधी
दुबई : जवळपास दोन वर्षात नंतर भारत आणि पाकिस्तान ह्या देशांमध्ये क्रिकेट सामना आज पार पडला. आयसीसी टी -20 विश्वचषकातील ग्रुप 1 मधील पाहिली मॅच आज भारत आणि पाकिस्तान दरम्यान दुबई येथे पार पडली. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर ही मॅच पार पडली. भारताविरुद्ध नाणेफेक जिंकून पाकिस्तानने प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला होता. आजवर वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानला भारतावर एकहाती विजय मिळवता आलेला न्हवता. पण आज झालेल्या मॅच मुळे पाकिस्तानचा हा रेकॉर्ड मोडला आहे.
ICC Men’s T20 World Cup : India loses to Pakistan
भारताने प्रथम बॅटिंग करत 152 धावांचे आव्हान पाकिस्तान समोर ठेवले होते. भारतीय कप्तान विराट कोहलीने 57 धावांची खेळी केली होती जी भारतीय बॅट्समन मधील सर्वाधिक धावांची खेळी होती.
पाकिस्तान कडून बॅटिंग करण्यासाठी पाकिस्तान टीमचा कप्तान बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान ह्यांनी एकही विकेट न गमावता विजय खेचून आणला. बाबर याने 68 धावा बनवल्या तर रिझवानने 79 धावा बनवल्या.
‘लवकर विकेट्स घेऊन दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करू. आमच्या तयारीबद्दल आम्हाला विश्वास आहे. पाकिस्तानचे गोलंदाज उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ओळखले जातात परंतु मी मला आमच्या फलंदाजीवरही विश्वास आहे. असे मत पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर अझम याने मॅच सुरू होण्यापूर्वी व्यक्त केले होते. दोन कट्टर प्रतिस्पर्धी टी -20 विश्वचषकात पाच वेळा एकमेकांना भेटले आहेत आणि ‘मेन इन ब्लू’ सर्व प्रसंगी जिंकले होते. पण आज पाकिस्तानने चांगली खेळी करून विजय मिळवला आहे.
ICC Men’s T20 World Cup : India loses to Pakistan
महत्त्वाच्या बातम्या
- IND vs PAK: महान सामन्यात हे पाच मोठे विक्रम होऊ शकतात, कोहली, रोहित आणि बुमराहलाही इतिहास रचण्याची संधी
- गोपीचंद पडळकर यांचं मोठं विधान ; म्हणाले – भविष्यात राजेश टोपेंची जागा आर्थर रोड तुरुंगात असेल
- १००% लसीकरणासाठी नाशिक जिल्ह्यातील ‘या’ गावाने लढविली आयडियेची कल्पना!!
- निजामशाहीची पालखी वाहण्यात मोठा आनंद; गोपीचंद पडळकर यांची संजय राऊतांवर टीका