• Download App
    ICC May Strip Bangladesh बांगलादेशात सत्तापालट

    Bangladesh : बांगलादेशात सत्तापालट ; ICC T20 विश्वचषकाचे यजमानपद काढून घेऊ शकते!

    टी-20 विश्वचषक श्रीलंका किंवा संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयोजित केला जाऊ शकतो


    विशेष प्रतिनिधी

    बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना  ( Sheikh Hasina ) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच त्यांनी देशही सोडला. आता लष्कराने बांगलादेशची सत्ता काबीज केली आहे. त्याचबरोबर या राजकीय घडामोडीचा परिणाम क्रीडासंबंधित कार्यक्रमांवरही होणार असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे बांगलादेशकडून महिला टी-२० विश्वचषकाचे यजमानपद काढून घेतले जाऊ शकते.

    मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयसीसी बांगलादेशातील परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे. आयसीसी महिला T20 विश्वचषक ऑक्टोबर महिन्यात बांगलादेशमध्ये आयोजित करण्याचा प्रस्ताव आहे, परंतु राजकीय परिस्थितीमुळे या स्पर्धेवर धोक्याचे ढग दाटून आले आहेत.



    या स्थितीत बांगलादेशच्या भूमीवर टी-20 विश्वचषक आयोजित करणे शक्य नसल्याचे मानले जात आहे. अशा परिस्थितीत महिला टी-20 विश्वचषक श्रीलंका किंवा संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयोजित केला जाऊ शकतो. मात्र, अद्याप याबाबत अधिकृत वक्तव्य आलेले नाही. पण ICC लवकरच मोठा निर्णय घेऊ शकते असे मानले जात आहे.

    बांगलादेशच्या इतिहासात लष्कराने सत्ता काबीज करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 1975 मध्येही लष्कराने तेथील सत्ता काबीज केली होती. त्यावेळी देशात शेख मुजीबुर रहमान यांचे सरकार होते. शेख मुजीबुर रहमान हे शेख हसीनाचे वडील होते. त्या काळात जेव्हा लष्कराने देशाची सत्ता काबीज केली होती, तेव्हा लष्कराने बांगलादेशवर सुमारे 15 वर्षे राज्य केले.

    ICC May Strip Bangladesh

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!