• Download App
    ICC champion trophy wins India

    रोहित शर्माच्या कॅप्टन्स इनिंगने चॅम्पियन्स ट्रॉफीवर कोरले भारताचे नाव!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : रोहित शर्माच्या कॅप्टन्स इनिंगने अखेरीस चॅम्पियन्स ट्रॉफी वर भारताचे नाव कोरले. भारताने न्युझीलँडचा पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सगळ्या सामन्यांमध्ये रोहित शर्माला धावा करण्यात फारसे यश मिळाले नाही. प्रत्येक सामन्यामध्ये तो 25 ते 30 धावा काढूनच बाद झाला होता त्यावरून भारताचा माजी कर्णधार सुनील गावस्करने त्याच्यावर टीका केली होती.

    मात्र आजच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात रोहित शर्माने कॅप्टन्स इनिंग खेळली आणि त्यामुळेच भारताचे नाव चॅम्पियन्स ट्रॉफीवर कोरले गेले. रोहित शर्माने 83 बॉल मध्ये 76 धावा केल्या. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या बाकीच्या सामन्यांमध्ये यशस्वी ठरलेल्या आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध शतक झळकावलेल्या विराट कोहलीला मात्र अंतिम सामन्यात अपयश आले तो फक्त एका धावेवर बाद झाला.

    रोहित शर्माला शुभमन गिल (31) आणि श्रेयस अय्यर (48) या दोघांनी चांगली साथ दिली. अखेरच्या षटकांमध्ये अक्षर पटेल (29) हार्दिक पंड्या (18) यांनी थोडीफार फटकेबाजी करून भारताचा विजय अंतिम टप्प्यात आणून ठेवला. के एल राहुल ने चिकाटीने फलंदाजी करत विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याने 33 चेंडू 34 धावा केल्या तर रवींद्र जडेजाने त्याला ९ धावा करून साथ दिली.

    तत्पूर्वी भारतीय गोलंदाजांनी सटीक गोलंदाजी करून न्यूझीलंडला 251 धावांवर रोखले होते. भारताने ते आव्हान 49 षटकांमध्ये पूर्ण करून 254 धावा केल्या आणि चॅम्पियन्स ट्रॉफीवर भारताचे नाव कोरले. त्याबरोबर भारतामध्ये आणि संपूर्ण जगामध्ये भारतीयांनी फटाक्यांची आतशबाजी करून चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजय साजरा केला.

    ICC champion trophy wins India

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Ajmer Principal : अजमेरमध्ये प्राचार्याचे वादग्रस्त वक्तव्य- पाकिस्तान आमचा मोठा भाऊ; देशाला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा तीनच नेते होते- गांधी, जिन्ना-आंबेडकर; नेहरूंचे नाव नव्हते

    Vande Mataram : वंदे मातरम् गायनादरम्यान उभे राहणे अनिवार्य होण्याची शक्यता, प्रोटोकॉल सरकारच्या विचाराधीन

    Rahul Gandhi : भाजपने म्हटले- राहुल यांनी ईशान्येकडील गमछा घातला नाही, त्यांनी राष्ट्रपतींचा प्रोटोकॉल मोडला