• Download App
    ICC ने जाहीर केले महिला T20 विश्वचषक 2024चे संपूर्ण वेळापत्रक! ICC Announces Full Schedule of Womens T20 World Cup 2024

    ICC ने जाहीर केले महिला T20 विश्वचषक 2024चे संपूर्ण वेळापत्रक!

    जाणून घ्या भारतीय संघ कोणत्या गटात?

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : ICC ने आज महिला T20 विश्वचषक 2024 चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. यावेळी बांगलादेश टी-20 विश्वचषकाचे यजमानपद भूषवत आहे. या स्पर्धेची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या संघांना अ गटात ठेवण्यात आले आहे. याशिवाय बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज या संघांना ब गटात स्थान देण्यात आले आहे. ICC Announces Full Schedule of Womens T20 World Cup 2024

    महिला T20 विश्वचषक 2024 3 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. पहिला सामना इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ढाका येथे होणार आहे. सर्व संघ आपापल्या गटात ४-४ सामने खेळणार आहेत. या स्पर्धेचा अंतिम सामना 20 ऑक्टोबर रोजी होणार आहे.



    अ गट- भारत, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, न्यूझीलंड, क्वालिफायर १.
    ब गट- बांगलादेश, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, क्वालिफायर २.

    भारतीय महिला क्रिकेट संघ 4 ऑक्टोबर रोजी महिला T20 विश्वचषक 2024 मध्ये आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. टीम इंडियाचा पहिला सामना न्यूझीलंडशी होणार आहे. यानंतर टीम इंडियाचा दुसरा सामना ६ ऑक्टोबरला पाकिस्तानशी होणार आहे. यानंतर, भारतीय संघ ९ ऑक्टोबर रोजी क्वालिफायर 1 शी स्पर्धा करेल. टीम इंडिया १३ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे.

    ICC Announces Full Schedule of Womens T20 World Cup 2024

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Asaduddin Owaisi : पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कीला असदुद्दीन ओवैसींनी सुनावले, म्हणाले..

    Operation Sindoor impact : भारत इथून पुढे दहशतवादाला act of war समजूनच ठोकणार, म्हणजे नेमके काय करणार??

    Fatah-2′ missile : चीनने पाकिस्तानला दिलेले ‘फतह-२’ क्षेपणास्त्र भारताने पाडले