केंद्रीय यंत्रणा मनी लाँड्रिंग प्रकरण तसेच कथित कोळसा खाण आणि मद्य घोटाळ्याची चौकशी करत आहे
विशेष प्रतिनिधी
रायपूर : ‘ईडी’ने छत्तीसगडच्या आयएएस अधिकारी राणू साहू यांना अटक केली आहे. यासोबतच ईडीने मनी लाँड्रिंगचा नवा गुन्हा दाखल केला आहे. काल ईडीने राणू साहूसह छत्तीसगडमधील अनेक व्यापारी आणि काँग्रेसच्या कोषाध्यक्षांच्या ठिकाणांवर छापे टाकले होते. IAS officer Ranu Sahu arrested by ED action was taken yesterday by raiding his house
यादरम्यान रानू साहू यांच्या घरावर तिसऱ्यांदा छापा टाकण्यात आला. यापूर्वी कोळसा खाणकामातील लेव्ही घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंगप्रकरणी त्यांच्या घरावर छापे टाकण्यात आले आहेत. एवढेच नाही तर त्यांचे पती आयएएस जेपी मौर्य यांच्या ठिकाणावरही छापे टाकण्यात आले आहेत. रानू साहू या रायगडच्या कलेक्टर होत्या.
काल मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाच्या तपासाचा भाग म्हणून ईडीने छत्तीसगडमधील काही आयएएस अधिकारी आणि काँग्रेस नेत्याच्या घरावर छापे टाकले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, आयएएस अधिकारी रानू साहू, काही अन्य अधिकारी आणि छत्तीसगड काँग्रेसचे नेते आणि पीसीसीचे कोषाध्यक्ष रामगोपाल अग्रवाल यांच्याशी संबंधित घरांवर छापे टाकण्यात आले आहेत.
केंद्रीय यंत्रणा राज्यातील मनी लाँड्रिंग प्रकरण तसेच कथित कोळसा खाण आणि मद्य घोटाळ्याची चौकशी करत आहे, ज्यामध्ये त्यांनी आयएएस अधिकाऱ्यांसह काही प्रमुख अधिकारी, अनेक नेते आणि त्यांच्याशी संबंधित लोकांना चौकशीच्या कक्षेत ठेवले आहे.
IAS officer Ranu Sahu arrested by ED action was taken yesterday by raiding his house
महत्वाच्या बातम्या
- कर्नाटकात ‘जेडीएस’ने निवडली भाजपाची साथ, कुमारस्वामींने केले जाहीर, म्हणाले…
- राजस्थानातल्या महिला अत्याचाराविरुद्ध आवाज उठवणाऱ्या काँग्रेसच्या मंत्र्याला मुख्यमंत्री अशोक गेहलोतांचा डच्चू!!
- मणिपूरवर बोलणाऱ्या गेहलोत सरकारला आरसा दाखवणाऱ्या राजेंद्र गुढा यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी!
- नागराज मंजुळेंचा नवा सिनेमा लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला