विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंजाबच्या फिरोजपूर मध्ये भारतीय हवाई दलाच्या हवाई पट्टीची जमीन परस्पर विकली. त्याबद्दल 28 वर्षांनंतर आई आणि मुलाविरुद्ध केस रजिस्टर झाली.
फिरोजपूर जिल्ह्यातल्या फत्तूवाला गावात ब्रिटिशांच्या काळापासून हवाई पट्टी होती तिचा वापर भारतीय हवाई दलाने असे 1962, 1965 आणि 1971 च्या युद्धात केला होता. पण 1997 मध्ये उषा अंसल आणि नवीन चंद्र अंसल या आई आणि मुलाने संबंधित हवाई पट्टीची बनावट कागदपत्रे बनवून ती जमीन परस्पर विकली. त्यावेळी त्यांच्या घोटाळ्याची साधी भनक काही यंत्रणांना लागली नव्हती.
2001 मध्ये संबंधित 15 एकर जमीन परस्पर नावावर करून घेण्याच्या वेळी हा घोटाळा उघडकीस आला. निवृत्त लष्करी अधिकारी निशांत सिंह यांनी या संदर्भात पंजाब आणि हरियाणा हायकोर्टात केस दाखल केली. हायकोर्टाने याची चौकशी आणि तपास करण्याचे आदेश देऊन उषा अंसल आणि नवीन चंद्र अंसल यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर फिरोजपूरच्या पोलीस अधीक्षकांना संपूर्ण प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले.
संबंधित हवाई पट्टीचा ताबा 1937 पासून भारतीय हवाई दलाकडे होता. 1962, 1965 आणि 1971 अशा तीन युद्धांमध्ये या हवाई पट्टीचा वापर देखील झाला होता. पण 1997 मध्ये उषा अंसल यांनी काही अधिकाऱ्यांशी संगणमत करून ही पंधरा एकर जागा ताब्यात घेतली. नंतर ती दारासिंह, मुख्तियार सिंह, जागीर सिंह यांच्यासह पाच जणांना परस्पर विकली.
घोटाळा उघडकीस आल्यानंतर हे खरेदीदार कोर्टात गेले. कोर्टाकडून वारंवार स्टे मिळवले. पण आता हायकोर्टाने या घोटाळ्याच्या मुळाशी जाऊन उषा अंसल आणि नवीन चंद्र अंसल यांच्याविरुद्ध केस दाखल करायचे आदेश दिले. त्याचबरोबर भारताच्या सुरक्षा संबंधी हा अत्यंत महत्त्वाचा मामला असल्याने भारतीय हवाई दलाने संबंधित जमीन संपूर्णपणे ताब्यात घ्यावी. या घोटाळ्याच्या तारा अन्या कुठे जोडल्या आहेत का?, याचा संपूर्ण तपास करावा असे आदेशही हायकोर्टाने दिले.
IAF strip used in wars secretly sold off using fake paper
महत्वाच्या बातम्या
- Manisha Kayande : उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे यांच्या विचारसरणी पूर्णपणे वेगळ्या – मनीषा कायंदे
- India-France : भारत-फ्रान्स संयुक्त लष्करी सराव ‘शक्ती-२०२५’ मुळे भारतीय सैन्याची क्षमता वाढणार
- Kolkata law college : कोलकाता येथील लॉ कॉलेजमधील सामूहिक बलात्कार प्रकरणात चौथी अटक
- Oman : ओमानमध्ये राहणाऱ्या सात लाख भारतीयांचं टेन्शन वाढणार?