वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हवाई दलाने ७५ विमानाद्वारे संथ गतीने उड्डाण (एलिफंट वॉक) करून सलामी दिली आहे.IAF commemorates ‘Azadi ka Amrit Mahotsav’ with 75 Rafales, Jaguars elephant walk
या एलिफंट वॉकमध्ये ७५ लढाऊ विमानांनी भाग घेतला, हे या कार्यक्रमाचे वैशिष्टय होते. त्यामध्ये प्रामुख्याने राफेल, जग्वार या विमानांचा समावेश होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्याचे आवाहन केले होते.
त्याला हवाईदलाने प्रतिसाद दिला. चक्क एकसाथ ७५ लढाऊ विमानांनी उड्डाण करत संथगतीने जाण्याचे कौशल्य सादर केले. या संदर्भातील काही छायाचित्रेही हवाई दलाने प्रकाशित केली आहेत. त्यात लढाऊ विमाने कशी उड्डाण करत आहेत. कशा प्रकारे संथ गतीने उडत आहेत,
याचे विहिंगम दृश्य देशवासियांना दाखविले आहे. या माध्यमातून भारताच्या हवाई दलाच्या सज्जतेची चणूक दाखविली आहे. लढाऊ विमाने अतिवेगाने उड्डाण करतात आणि क्षणात मारा करून नाहीशी होतात.
पण तेच विमान एकसाथ एका क्रमाने आणि एका टप्प्यात तेही संथ गतीने उडविण्यासाठी पायलटचे खरे कौशल्य पणाला लागते. नेमकी हीच बाब या सलामीतून दिसून आली. यातून हवाई दलाच्या कर्तबगारीचे दर्शन देशवासियांना घडले हे मात्र नक्की.
IAF commemorates ‘Azadi ka Amrit Mahotsav’ with 75 Rafales, Jaguars elephant walk
महत्त्वाच्या बातम्या
- ज्या भारतीयांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत त्यांच्यासाठी विशेष ऑफर, ही विमान कंपनी देणार आता एका तिकिटासह एक तिकीट मोफत
- कोकण, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रासह विदर्भातील काही जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज
- राहुल गांधींनी केंद्र सरकारच्या जालियनवाला बागच्या नूतनीकरणाचा केला निषेध
- भाजपचे खासदार आनंद भास्कर रापोलू यांनी जातीच्या जनगणनेबाबत पंतप्रधान मोदींना लिहिले पत्र , नितीशकुमार यांनीही आवाज उठवला