संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तामिळनाडूमध्ये आयएएफ हेलिकॉप्टर क्रॅशबद्दल संसदेच्या दोन्ही सभागृहांना माहिती देतील IAF Chopper Crash: Defence Minister Rajnath Singh Addressung Lok Sabha
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : बुधवारी IAF Mi-17V5 हेलिकॉप्टर अपघातात CDS बिपिन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत आणि इतर 11 जणांचा मृत्यू झाल्यानंतर, IAF प्रमुख एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी यांनी गुरुवारी तामिळनाडूच्या निलगिरी जिल्ह्यातील कुन्नूरजवळ अपघातस्थळी भेट दिली. दरम्यान, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत पोहोचले असून, ते लोकसभेत हेलिकॉप्टर अपघाताबाबत निवेदन देत आहेत त्यानंतर राज्यसभेत निवेदन देतील.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह लोकसभेत या अपघाताबाबत संबोधन करत आहेत. त्यांच्या वक्तव्यानंतर लोकसभेत मृत्यूबद्दल श्रद्धांजली अर्पण. अत्यंत दु:ख आणि जड अंतःकरणाने, मी 8 डिसेंबर 2021 रोजी दुपारी लष्करी हेलिकॉप्टरच्या अपघाताची दुर्दैवी बातमी सांगण्यासाठी उभा आहे. भारताचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत या अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमध्ये होते.12.15 वाजता हेलिकॉप्टरला विलिंग्टनमध्ये लँड व्हायचं होतं.
सुलुर येथील एअरबेसनं 12.08 हेलिकॉप्टरवरील आपलं नियंत्रण गमावलं. थोड्या वेळानंतर स्थानिक लोकांनी जंगलात आग लागल्याचं पाहिलं. त्यानंतर स्थानिक प्रशासनाचं पथक तिथं पोहोचलं. तिथून जेवढ्या लोकांना बाहेर काढता येईल त्यांना काढण्यात आलं. मात्र , 14 पैकी 13 जणांचा मृत्यू झाला आहे.
IAF Chopper Crash : Defence Minister Rajnath Singh Addressung Lok Sabha
महत्त्वाच्या बातम्या
- CDS Bipin Rawat : सीडीएस रावत आणि त्यांच्या पत्नीचे पार्थिव आज दिल्लीत पोहोचणार; कुन्नूरमधील अपघातस्थळावरून ब्लॅक बॉक्स आढळला
- ओमायक्रोनच्या धोक्यामुळे दहावी-बारावीच्या लेखी परीक्षा कशा होणार, शिक्षण मंडळापुढे पेच; पर्यायी तोडग्याचा विचारही
- प्रत्येक जिल्ह्यात कोरोनाविरोधी लसीकरणासाठी कॉल सेंटर उभारणार; ९८ लाख जण दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत
- Bipin Rawat : जनरल रावत यांच्या जागी कोण ? सीडीएस म्हणून ‘या’ मराठमोळ्या अधिकाऱ्याच नाव आघाडीवर…