IAF Air Show : भारतीय हवाई दलाने रविवारी श्रीनगरमध्ये एअर शो आयोजित केला. यामध्ये स्काय डायव्हिंग टीम गॅलेक्सी, सूर्य किरण एअरोबॅटिक आणि डिस्प्ले टीमने डल लेकवर आसमंतात चित्तथरारक कसरती केल्या. पॅरामोटर फ्लाइंग हेदेखील कार्यक्रमाचे वैशिष्ट्य होते. हा कार्यक्रम काश्मीर खोऱ्यात 13 वर्षानंतर झाला. हवाई दलाच्या सिम्फोनिक वाद्यवृंदानेही यात भाग घेतला. IAF Air Show in Kashmir after 13 years, Skydiving, aerobatics and aerobatics at Dal Lake
वृत्तसंस्था
श्रीनगर : भारतीय हवाई दलाने रविवारी श्रीनगरमध्ये एअर शो आयोजित केला. यामध्ये स्काय डायव्हिंग टीम गॅलेक्सी, सूर्य किरण एअरोबॅटिक आणि डिस्प्ले टीमने डल लेकवर आसमंतात चित्तथरारक कसरती केल्या. पॅरामोटर फ्लाइंग हेदेखील कार्यक्रमाचे वैशिष्ट्य होते. हा कार्यक्रम काश्मीर खोऱ्यात 13 वर्षानंतर झाला. हवाई दलाच्या सिम्फोनिक वाद्यवृंदानेही यात भाग घेतला.
श्रीनगर हवाई दलाच्या तळाने आणि जम्मू -काश्मीर प्रशासनाने ‘आझादी का अमृत महोत्सव’ सेलिब्रेशनचा भाग म्हणून एअर शो आयोजित केले आहेत, असे आयएएफच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ते म्हणाले की, एअर शोची थीम ‘गिव्ह विंग्ज टू युअर ड्रीम’ आहे. खोऱ्यातील तरुणांना हवाई दलात सामील होण्यासाठी आणि पर्यटनाला प्रोत्साहन देणे हा त्याचा उद्देश आहे.
जम्मू-काश्मीरमधील शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरमध्ये हा एअर शो आयोजित करण्यात आला होता. लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा, वेस्टर्न एअर कमांडचे ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ बीआर कृष्णा यांच्यासह अनेक प्रमुख अधिकारी यात सहभागी झाले होते.
IAF Air Show in Kashmir after 13 years, Skydiving, aerobatics and aerobatics at Dal Lake
महत्त्वाच्या बातम्या
- UP Cabinet Expansion : योगी मंत्रिमंडळाचा विस्तार, काँग्रेस सोडून आलेल्या जितीन प्रसाद यांना कॅबिनेट, सहा नेते राज्यमंत्री
- ६५ तासांत २४ बैठका : पंतप्रधान मोदींचा व्यग्र अमेरिका दौरा ठरला अर्थपूर्ण आणि फलदायी
- Delhi Metro : 3.55 मिलियन कार्बन क्रेडिट्सच्या विक्रीतून दिल्ली मेट्रोने केली 19.5 कोटींची कमाई
- नक्षलवादाचा शेवट जवळ आलाय; त्यांची आर्थिक कोंडी करा; गृहमंत्री अमित शहा यांची महत्त्वपूर्ण सूचना
- Bhabanipur by Polls : कोलकाता डीसीपीवर भाजप उमेदवार प्रियंका टिबरेवाल यांच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप, निवडणूक आयोगाकडे तक्रार