• Download App
    'मी केजरीवालांचा पर्दाफाश करीन, सरकारी साक्षीदार बनेन', सुकेश चंद्रशेखरचं वक्तव्य!|I will expose Kejriwal become a government witness Sukesh Chandrasekhars statement

    ‘मी केजरीवालांचा पर्दाफाश करीन, सरकारी साक्षीदार बनेन’, सुकेश चंद्रशेखरचं वक्तव्य!

    ‘तिहार तुरुंगात आपले स्वागत आहे’ असंही सुकेशने पत्राद्वारे म्हटले आहे.


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या टीमचा पर्दाफाश केल्याचा दावा महाठग असलेल्या सुकेश चंद्रशेखर याने केला आहे. मी त्याचा पर्दाफाश करीन, केजरीवाल आणि त्यांच्या टीमविरुद्ध सरकारी साक्षीदार होईन आणि त्यांना शिक्षा होईल याची मी खात्री करून घेईन, असे सुकेशने दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात सांगितले.I will expose Kejriwal become a government witness Sukesh Chandrasekhars statement

    न्यायालयाने शुक्रवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात 28 मार्चपर्यंत अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कोठडीत पाठवले आहे.



    केजरीवाल यांच्या अटकेनंतर सुकेश चंद्रशेखर याने त्यांना पत्र लिहिले होते आणि ज्याद्वारे सुकेश यानं खोचकपणे म्हटले होते की, मी तिहार जेलच्या क्लबमध्ये त्यांचे (केजरीवाल) स्वागत करतो. तसेच सुकेशने पत्रात लिहिले होते की, सत्याचा नेहमीच विजय होतो. माझे प्रिय अरविंद केजरीवाल, सर्वप्रथम मी तुमचे स्वागत करतो. तुम्ही तिहार क्लबचे ‘बॉस’ आहात. तिहार क्लब आता तीन भाऊ चालवतील.

    सुकेश यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, नव्या भारताच्या शक्तीचे हे एक अद्भुत उदाहरण आहे, जे कायद्याच्या वर कोणीही नाही हे दर्शवते. तुम्ही आणि तुमच्या भावांनी दिल्लीतील जनतेची फसवणूक केली आहे. प्रभू रामाने तुम्हाला तुमच्या भ्रष्टाचाराची आणि कर्माची शिक्षा दिली आहे. वरचा सर्व काही पाहत असतो.

    दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) गुरुवारी रात्री अटक केली. यापूर्वी एजन्सीने केजरीवाल यांना नऊ समन्स पाठवले होते, मात्र ते एकदाही एजन्सीसमोर हजर झाले नव्हते.

    I will expose Kejriwal become a government witness Sukesh Chandrasekhars statement

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Pakistan : पाकिस्तानच्या कुरापती सुरूच, अरुणाचलवरील चीनच्या दाव्याला दिला पाठिंबा; भारताने दिले प्रत्युत्तर

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले- मंदिरातील देणगी ही देवाची मालमत्ता; बँका वाचवण्यासाठी नाही

    Anil Ambani : अनिल अंबानी समूहाची १,१२० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त; आतापर्यंत १०,११७ कोटी रुपये जप्त; मनी लाँड्रिंग प्रकरणात कारवाई