• Download App
    "मी महादेव बेटिंग अॅपचा मालक, भूपेश बघेलच्या सांगण्यावरून दुबईला गेलो होतो" शुभम सोनीचा खुलासा! I went to Dubai on the request of Bhupesh Baghel owner of Mahadev Betting App Shubham Soni reveals

    “मी महादेव बेटिंग ॲपचा मालक, भूपेश बघेलच्या सांगण्यावरून दुबईला गेलो होतो” शुभम सोनीचा खुलासा!

    शुभम सोनी हा ईडीला मनी लाँड्रिंग प्रकरणात हवा आहे.

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : महादेव ऑनलाइन बेटिंग ॲप प्रकरणात आरोपी शुभम सोनी याने दुबईतून व्हिडिओ बनवून वक्तव्य जारी केले आहे.  मी महादेव ॲपचा खरा मालक असल्याचे त्याने सांगितले असून भूपेश बघेलच्या सांगण्यावरून तो दुबईला गेला होता. I went to Dubai on the request of Bhupesh Baghel owner of Mahadev Betting App Shubham Soni reveals

    छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यावर त्याने अनेक गंभीर आरोप केले आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नुकतेच ५.३९ कोटी रुपये जप्त केले होते. ईडीच्या म्हणण्यानुसार ही रक्कम शुभम सोनी याने दुबईहून भूपेश बघेलसाठी पाठवली होती.

    ईडीच्या म्हणण्यानुसार, शुभम सोनीच्या सूचनेनुसार असीम दास ही रक्कम देणार होता. शुभम सोनी हा ईडीला मनी लाँड्रिंग प्रकरणात हवा आहे.

    महादेव बेटिंग ॲपची सुरुवात 2021 मध्ये झाली होती –

    महादेव ॲपच्या प्रवर्तकाच्या जवळचा शुभम सोनी याने रविवारी एका व्हिडिओ संदेशात दावा केला की, ‘मी महादेव बेटिंग ॲपचा मालक आहे.’ त्याने आपले पॅन कार्ड, आधार कार्ड आणि पासपोर्ट दाखवले आणि दावा केला की त्याने 2021 मध्ये महादेव बेटिंग ॲप सुरू केले होते.

    दरम्यान अंमलबजावणी संचालनालयाच्या विनंतीवरून केंद्र सरकारने महादेव बेटिंग ॲपवर बंदी घातली आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (MeitY) महादेव बुक आणि ReddyAnnaPristoPro सह 22 बेकायदेशीर बेटिंग ॲप आणि वेबसाइट्सच्या विरोधात ब्लॉकिंग आदेश जारी केले आहेत.

    I went to Dubai on the request of Bhupesh Baghel owner of Mahadev Betting App Shubham Soni reveals

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Marco Rubio and S Jaishankar : अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी एस जयशंकर यांच्याशी केली चर्चा

    Asaduddin Owaisi : पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कीला असदुद्दीन ओवैसींनी सुनावले, म्हणाले..

    Operation Sindoor impact : भारत इथून पुढे दहशतवादाला act of war समजूनच ठोकणार, म्हणजे नेमके काय करणार??