• Download App
    चन्नींच्या शपथविधीला निमंत्रण नव्हते, भगवंत मान यांनी बोलावल्याबद्दल आभार, काँग्रेस खासदार मनीष तिवारींचे काँग्रेसच्या वादाच्या आगीत तेल!!I was not invited at swering in ceremony of charanjeet singh channi, but bhagwant maan invited me, says congress mp manish tiwari

    Bhagwant Maan : चन्नींच्या शपथविधीला निमंत्रण नव्हते, भगवंत मान यांनी बोलावल्याबद्दल आभार, काँग्रेस खासदार मनीष तिवारींचे काँग्रेसच्या वादाच्या आगीत तेल!!

    वृत्तसंस्था

    चंडीगड – पंजाबमध्ये आम आदमी पार्टीचे नेते भगवंत मान यांचा भव्य समारंभात क्रांतिकारक शहीद भगत सिंग यांच्या गावात मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी होत आहे. त्याच वेळी काँग्रेसमध्ये पराभवाचे घमासान आणखी वाढले आहे.I was not invited at swering in ceremony of charanjeet singh channi, but bhagwant maan invited me, says congress mp manish tiwari

    काँग्रेसचे नेते आणि आनंदपूर साहिबचे खासदार मनीष तिवारी यांच्या ट्विटने काँग्रेसमधल्या भांडणाच्या आगीत तेल ओतले आहे. मला चरणजित चन्नी यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीला निमंत्रण नव्हते. पण भगवंत मान यांनी शपरथविधी निमंत्रण दिले आहे. मी त्यांचे आभार मानतो. सध्या संसदेच्या अधिवेशनात व्यग्र असल्याने मी शपथविधीला हजर राहू शकत नाही, म्हणून दिलगिरी व्यक्त करतो. भगवंत मान यांच्या राजकीय वाटचालीस शुभेच्छा, असे ट्विट मनीष तिवारी यांनी केले आहे.

    आधीच पंजाब काँग्रेसमध्ये पराभवानंतर राजकीय घमासान माजले आहे. कोणताच नेता कोणाचे नियंत्रण मानायला तयार नाही. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिध्दू यांचा राजीनामा घेतला आहे. त्यातच आता मनीष तिवारींच्या ट्विटने काँग्रसमधल्या भांडणाच्या आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे.

    -सोनिया – पंजाब खासदार भेट

    सोनिया गांधी आज दुपारी १२.३० वाजता पंजाबमधल्या काँग्रेस खासदारांना भेटल्या आहेत. त्यामध्ये पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पत्नी खासदार हरजित कौर गैरहजर आहेत.

    I was not invited at swering in ceremony of charanjeet singh channi, but bhagwant maan invited me, says congress mp manish tiwari

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ‘Ajey’ film : योगी आदित्यनाथ यांच्या जीवनावर आधारित ‘अजेय’ चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या परवानगीअभावी अडकला

    PM Dhan-Dhanya Krishi Yojana : केंद्राची पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेला मंजुरी; कमी कृषी उत्पादन असलेल्या 100 जिल्ह्यांवर लक्ष; 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा

    RBI Governor : सरकार व्याजदरात आणखी कपात करू शकते; RBI गव्हर्नर म्हणाले- GDP डेटामध्ये मंदी असल्यास कमी केले जाऊ शकतात व्याजदर