वृत्तसंस्था
अंबाला (हरियाणा) : गेली २३ वर्षं धडाडीच्या ऑफिसर म्हणून नावलौकिक मिळवलेल्या हरयाणातल्या अंबालाच्या पोलिस महानिरीक्षक भारती अरोरा यांनीही स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज केला आहे. पण त्यांच्या अर्जाची चर्चा आहे त्यांनी दिलेल्या कारणामुळे.त्यांना उर्वरित आयुष्य कृष्णभक्तीत व्यतीत करण्याची इच्छा आहे. I want to spend the rest of my life in devotion to Krishna ‘; Application for voluntary retirement of a female police officer
उर्वरित आयुष्य कृष्णभक्तीत व्यतीत करण्याची इच्छा आहे. त्यामुळे सेवानिवृत्ती द्या, असा अर्ज भारती अरोरा यांनी अर्ज केला. पोलिस दलातल्या २३ वर्षांच्या सेवेनंतर त्यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केला आहे. आतापर्यंत जीवन गुन्हेगारांना धडा शिकवण्यासाठी व्यतीत केल्यानंतर भारती यांना आता कृष्णभक्तीत लीन व्हायचं आहे. हरियाणातल्या वरिष्ठ आयपीएस अधिकारी असलेल्या भारती अरोरा यांनी आपल्या कार्यकाळात अनेक महत्त्वाच्या गुन्ह्यांच्या तपासात महत्त्वाची भूमिका निभावली असून, धडाडीने काम करण्याच्या पद्धतीसाठी त्या ओळखल्या जातात.
भारती अरोरा १९९८ च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. २००७ मध्ये समझोता एक्स्प्रेसमध्ये बॉम्बस्फोट झाला, त्या वेळी (रेल्वे) पोलिस अधीक्षक या नात्याने त्यांनी त्या प्रकरणाचं कामकाज पाहिलं होतं. सध्या हरियाणाच्या राज्य सरकारमध्ये मंत्री असलेल्या अनिल विज यांना अरोरा यांनी २००९मध्ये अटक केली होती. तेव्हा त्या अंबालाच्या पोलिस अधीक्षक होत्या आणि अनिल विज आमदार होते. त्या प्रकरणाची बरीच चर्चा झाली होती. २०१५ मध्ये वरिष्ठ अधिकारी नवदीपसिंग विर्क यांनी बलात्काराच्या एका प्रकरणाच्या तपासात हस्तक्षेप केल्याचा आणि धमकावल्याचा आरोप अरोरा यांनी केला होता.
अशा डॅशिंग व्यक्तिमत्त्वाच्या भारती अरोरा यांनी कृष्णभक्तीचं कारण देऊन स्वेच्छानिवृत्तीची मागणी केली आहे. ‘मी आता गुरू नानकदेव, चैतन्य महाप्रभू, कबीरदास, तुलसीदास, सूरदास, मीराबाई, सूफी यांसारख्या महान संतांनी दाखवलेल्या मार्गावर चालू इच्छिते. मी आता जीवनाचं अंतिम उद्दिष्ट गाठू इच्छिते. त्यासाठी उर्वरित जीवन मला कृष्णभक्तीसाठी समर्पित करायचं आहे. म्हणूनच पोलिस दलातल्या २३ वर्षांच्या सेवेनंतर मी आता सेवानिवृत्त होऊ इच्छिते,’ असं भारती अरोरा यांनी म्हटलं आहे.
‘मी, माझ्या वयाच्या ५० व्या वर्षी अखिल भारतीय सेवा नियम १९५८ च्या नियम १६ (२) नुसार एक ऑगस्ट २०२१ पासून स्वेच्छानिवृत्ती मिळण्यासाठी अर्ज करत आहे,’ असं अरोरा यांनी पत्रात लिहिलं आहे. पोलिस महासंचालक मनोज यादव यांच्या माध्यमातून अरोरा यांनी हे पत्र मुख्य सचिव विजय वर्धन यांना पाठवलं आहे.
I want to spend the rest of my life in devotion to Krishna ‘; Application for voluntary retirement of a female police officer
महत्त्वाच्या बातम्या
- जोपर्यंत लस दिली जात नाही, तोपर्यंत मुलांना शाळेत पाठवण्याबाबत पालक अनुत्सुक
- प्रतिमा मलिन केली जात असल्याचा शिल्पा शेट्टीचा आरोप, माध्यमांविरोधात उच्च न्यायालयात धाव
- जावई तुरुंगात जातील त्यावेळी केंद्रातील सरकार पडेल, भाजपवर टीका करताना आपचा गांधी कुटुंबियांवर निशाणा
- आम्हाला काही करण्याची गरज नाही, महाविकास आघाडी सरकार अंर्तविरोधानेच पडेल, राज ठाकरे यांच्या परप्रांतियांच्या भूमिकेत स्पष्टता येत नाही तोपर्यंत एकत्र येण्यास बंधने, देवेंद्र फडणवीस यांनी केले स्पष्ट