वृत्तसंस्था
नवी दिल्ली : टोकियो ऑलिंपिकमध्ये पदक जिंकण्यात अयशस्वी ठरलेली भारताची सुपरस्टार बॉक्सर मेरी कोमने पदक न जिंकल्याबद्दल देशाची माफी मागितली आहे. परंतु त्याच वेळी तिने बॉक्सिंग क्षेत्रात come back करू, असा आत्मविश्वासही जागविला आहे. मेरी कोम पदकाशिवाय भारतात परतली. कोलंबियाच्या व्हेलिंका हिच्यासमोर तिला हार पत्करावी लागली. I still have the age, can play till 40: Mary Kom on making a comeback
“परंतु, माझा पराभव झालेला नाही. पहिले दोन राऊंड मी जिंकले होते. त्यानंतर मी कशी काय पराभूत होऊ शकते?, असा सवाल मेरी कोमने विचारला.
ऑलिंपिकच्या अधिकाऱ्यांनी माझ्या जर्सीवर आक्षेप घेतला हे माझे मेंट हँरसमेंट होते. आधीच्या लढतीत त्यांनी माझ्या जर्सीवर आक्षेप घेतला नव्हता. आयत्या वेळेला ते कसा काय आक्षेप नोंदवू शकतात? तो पक्षपाती पणा होता, असा आरोप मेरी कोम हिने केला.
देशात मी पदक घेऊन येणे अपेक्षित होते. सर्व भारतीयांच्या माझ्यावर लक्ष केंद्रित झाले होते. परंतु तुम्ही पदक आणू शकले नाही त्याबद्दल मी देशाची माफी मागते, अशा भावना तिने व्यक्त केल्या.
त्याच वेळी माझ्या हातात माझे वय आहे चाळीसाव्या वर्षी पर्यंत मी बॉक्सिंग क्षेत्रात चांगली कामगिरी करू शकते मी नक्की come back करेन, असा आत्मविश्वासही तिने जागविला. मेरी कोम भारताची सुपरस्टार बॉक्सर आहे तिने भारताची मान बॉक्सिंग क्षेत्रात उंचावलेली आहे ती कायमच भारतीयांसाठी सुपरस्टार राहील अशा भावना माजी क्रीडा मंत्र्यांनी व्यक्त केल्या आहेत.