विशेष प्रतिनिधी
मुंबई : “इंडिया” आघाडीच्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये झालेल्या तिसऱ्या बैठकीनंतरही आघाडीला स्वतःचा नेता निवडता आला नाही. लोगो तयार करता आला नाही आणि संयोजकही नेमता आला नाही. त्या ऐवजी आघाडीतल्या नेत्यांनी एक-दोन नव्हे, तर तब्बल 5 समित्या तयार करून त्यामध्ये 75 सदस्यांची भरमार नियुक्ती करून टाकली.I.N.D.I.A. couldn’t elect their leader, nor logo or even convener, but only appoints 5 committees with 75 members
या वेगवेगळ्या समित्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून “इंडिया” आघाडीचा लोकसभेची निवडणूक एकत्र लढविण्याचा मनसूबा पार पाडणार आहेत. पण या समित्या नेमक्या कुणाला उत्तरदायी असणार?? आणि त्या नेमके कुणाला रिपोर्टिंग करणार??, हे मात्र ग्रँड हयात मधल्या बैठकीनंतरही गुलदस्त्यातच राहिले.
आघाडीच्या तिसऱ्या बैठकीमधली सर्वात मोठी फलश्रुती म्हणजे 13 सदस्यांची समन्वय समिती होय. काँग्रेसचे संघटन सचिव के. सी. वेणूगोपाल यांच्या नेतृत्वाखालच्या समितीत त्यांना राजकारणात सर्वात सीनियर असलेले नेते शरद पवार आणि संजय राऊत यांचाही समावेश करण्यात आला आहे.
पण ही एकमेव समन्वय समिती नाही तर त्या खेरीज अन्य चार समित्या आहेत आणि या सर्व पाच समित्या मिळून 28 पक्षांमधल्या 75 नेत्यांची नियुक्ती या समित्यांमध्ये करण्यात आली आहे.
– समन्वय समिती आणि निवडणूक धोरण समिती 1. के. सी. वेणुगोपाल, काँग्रेस 2.शरद पवार, राष्ट्रवादी 3. टी. आर. बाळू, द्रमूक 4. हेमंत सोरेन, JMM 5. संजय राऊत, ठाकरे गट 6. तेजस्वी यादव, राजद 7. अभिषेक बॅनर्जी, टीएमसी 8. राघव चड्ढा, आप 9. जावेद अली खान, समाजवादी पार्टी 10. लल्लन सिंग, जदयू 11. डी. राजा, भाकप 12. ओमर अब्दुल्ला, नॅशनल कॉन्फरन्स 13. मेहबूबा मुफ्ती, पीडीपी 14. CPI-M (नाव नमूद नाही)
निवडणूक प्रचार समिती
1. गुरदीप सिंग सप्पल, काँग्रेस 2. संजय झा, जदयू 3. अनिल देसाई, ठाकरे गट 4. संजय यादव, राजद 5.पी. सी. चाको, शरदनिष्ठ राष्ट्रवादी 6.चंपाई सोरेन, JMM 7. किरणमय नंदा, समाजवादी पार्टी 8. संजय सिंह, आप 9. अरुण कुमार, सीपीआय (एम) 10. बिनॉय विश्वम, भाकप 11. न्यायमूर्ती (निवृत्त) हसनैन मसूदी, नॅशनल कॉन्फरन्स 12. शाहिद सिद्दीकी, राजद 13. एन. के. प्रेमचंद्रन, आर.एस.पी 14.जी. देवराजन, एआयएफबी 15. रवी राय, CPI(ML) 16. थिरुमावलन, व्ही.सी.के 17. के. एम. कादर मोईदीन, आययूएमएल 18. जोस के. मणी, केसी (एम)19. TMC (नाव नमूद नाही)
सोशल मीडिया समिती
1. सुप्रिया श्रीनाते, काँग्रेस 2. सुमित शर्मा, राजद 3. आशिष यादव, समाजवादी पार्टी 4. राजीव निगम, एस.पी5.राघव चड्ढा, आप 6.अविंदानी, JMM 7.इल्तिजा मेहबूबा, पीडीपी 8.प्रांजल, सीपीएम 9.डॉ.भालचंद्रन कानगो, भाकप 10. इफ्रा जा, NC 11.व्ही अरुण कुमार, सीपीआय(एमएल)12. TMC (नाव नमूद नाही)
मीडिया कमिटी
1.जयराम रमेश, काँग्रेस 2.मनोज झा, राजद 3.अरविंद सावंत, ठाकरे गट 4. जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी 5. राघव चड्ढा, आप 6.राजीव रंजन, जदयू 7. प्रांजल, सीपीएम 8. आशिष यादव, समाजवादी पार्टी 9. सुप्रियो भट्टाचार्य, जेएमएम 10.आलोक कुमार, जेएमएम 11.मनीष कुमार, जदयू 12.राजीव निगम, एस.पी 13.भालचंद्रन कानगो, सीपीआय 14.तन्वीर सादिक, एन.सी 15.प्रशांत कन्नोजिया 16. नरेन चॅटर्जी, एआयएफबी 17.सुचेता डे, सीपीआय (एमएल) 18.मोहित भान, पीडीपी 19. TMC (नाव नमूद नाही)
संशोधन समिती
1.अमिताभ दुबे, काँग्रेस 2.सुबोध मेहता, राजद 3.प्रियांका चतुर्वेदी, एस. एस. 4.वंदना चव्हाण, राष्ट्रवादी 5. के. सी. त्यागी, जदयू 6. सुदिव्य कुमार सोनू, जेएमएम 7.जस्मिन शाह, आप 8.आलोक रंजन, एस.पी 9. इम्रान नबी दार, एनसी10.आदित्य, पीडीपी11. TMC (नाव नमूद नाही) हे ७५ सदस्य वेगवेगळ्या पाच कमिट्यांवर काम करणार आहेत.
यातील सर्व समित्यांवर काँग्रेसने आपले वर्चस्व राखले आहे. जास्तीत जास्त प्रादेशिक पक्षांना सामावून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
I.N.D.I.A. couldn’t elect their leader, nor logo or even convener, but only appoints 5 committees with 75 members
महत्वाच्या बातम्या
- नेहरूंचा इंदिराजींनी सोडून दिलेला वारसा मोदी पुढे घेऊन जातायेत, तरी काँग्रेससह सर्व विरोधकांचा आक्षेप??
- मुंबईत “इंडिया” आघाडीचा “मास्टर स्ट्रोक”; तर दिल्लीत मोदींचा “ग्रँडमास्टर स्ट्रोक”!!
- मराठमोळे अजय पुरकर आता टॉलीवूड गाजवणार ! दक्षिणात्य हिरो व्हीलन समोर मोठ आवाहन!
- संसदेच्या विशेष अधिवेशनातून विरोधकांना “भूल”, की “एक देश एक निवडणुकीची” चाहूल?