• Download App
    I.N.D.I.A : समन्वय समिती शरद पवारांचे नाव; याचा अर्थ ते आघाडीच्या पहिल्या फळीचे नेते उरले नाहीत काय?? I.N.D.I.A coordination committee incorporated sharad pawar's name in it, it means he has not remained first level leader in alliance

    I.N.D.I.A : समन्वय समिती शरद पवारांचे नाव; याचा अर्थ ते आघाडीच्या पहिल्या फळीचे नेते उरले नाहीत काय??

    नाशिक : मुंबईच्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये पार पडलेल्या “इंडिया” आघाडीच्या तिसऱ्या बैठकीमध्ये आघाडीने आपला नेता निवडला नाही. संयोजक नेमला नाही आणि लोगोही ठरविला नाही. त्या ऐवजी समन्वय समितीसह 5 मोठ्या समित्या नेमून त्यामध्ये एकूण 75 नेत्यांचा समावेश केला. ही “इंडिया” आघाडीच्या बैठकीतली सर्वात मोठी फलश्रुती ठरली. I.N.D.I.A coordination committee incorporated sharad pawar’s name in it, it means he has not remained first level leader in alliance

    पण त्यापलीकडे जाऊन समन्वय समितीतली नावे आणि अन्य 4 समित्यांमधली नावे आणि त्यांचे पक्ष विचारात घेतले, तर अनेक बाबी समोर येतात.

    पण त्यातून एक अत्यंत महत्त्वाची बाब अधोरेखित होते, ती म्हणजे “इंडिया” आघाडीतले वयाने सर्वांत ज्येष्ठ नेते शरद पवार हे आता आघाडीतल्या पहिल्या फळीतले नेते उरलेले नाहीत, ही होय!! कारण “इंडिया” आघाडीने नेमलेल्या समन्वय समितीत काँग्रेस सह सर्व प्रादेशिक पक्षांचे दुसऱ्या फळीतले नेते समाविष्ट आहेत. त्यामध्ये पवारांच्या नावाचा समावेश आहे.

    समन्वय समिती अथवा अन्य कोणत्याही समितीत नसलेल्या नेत्यांची नावे लक्षात घेतली, तर ही बाब खुलासेवार स्पष्ट होईल. सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, ममता बॅनर्जी, नितीश कुमार, उद्धव ठाकरे, अरविंद केजरीवाल, एम. के. स्टालिन यांची नावे या समन्वय समितीत नाहीत. हे सर्व नेते आपापल्या पक्षांचे सर्वोच्च नेते आहेत आणि ते “इंडिया” आघाडीतले पहिल्या फळीचे नेते आहेत.

    समन्वय समितीमध्ये हेमंत सोरेन या झारखंडच्या मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे. या खेरीज पीडीपीच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती, जदयूचे अध्यक्ष लल्लन सिंह यांचाही समावेश आहे, पण लल्लन सिंह हे पक्षाध्यक्ष असले तरी जदयूचे ते सर्वोच्च नेते नाहीत, तर नितीश कुमार हेच सर्वोच्च नेते आहेत. त्याचबरोबर एम.के. स्टालिन यांच्या द्रमुक पक्षाचे दुसऱ्या फळीतले नेते टी. आर. बालू हे समन्वय समितीत आहेत. लालूप्रसादांचे पुत्र बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी यांचे पुतणे खासदार अभिषेक बॅनर्जी, आम आदमी पार्टीचे खासदार राघव चढ्ढा, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्लांचे चिरंजीव ओमर अब्दुल्ला यांचा तसेच, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते डी. राजा यांचा समन्वय समितीत समावेश आहे. हे सगळे नेते दुसऱ्या फळीतले मानले जातात.


    मुंबईत “इंडिया” आघाडीचा “मास्टर स्ट्रोक”; तर दिल्लीत मोदींचा “ग्रँडमास्टर स्ट्रोक”!!


    इंडिया आघाडीत आपला वरचष्मा ठेवण्यासाठी काँग्रेसने सर्व 5 समित्यांमध्ये प्रमुख नेते आपलेच नेमले आहेत. त्यातही समन्वय समितीचे प्रमुख पद गांधी घराण्याचे निकटवर्ती आणि काँग्रेसचे संघटन सचिव के. सी. वेणूगोपाल यांच्याकडे दिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली शरद पवार समन्वय समितीत काम करणार आहेत.

    याचा राजकीय अर्थ असा, की ज्या समन्वय समितीमध्ये काँग्रेस सह सर्व महत्त्वाच्या घटक पक्षांचे मुख्य नेते बिलकुलच नाहीत, उलट त्यांनी आपापले प्रतिनिधी म्हणून दुसऱ्या फळीतले नेते समन्वय समितीत नेमले आहेत.

    शरद पवारांना देखील आपल्या गटातून खासदार सुप्रिया सुळे अथवा जयंत पाटील यांच्या नावांचा समावेश समन्वय समितीत करता आला असता, पण तो त्यांनी केला नाही. उलट त्यांच्या स्वतःच्याच नावाचा समावेश समन्वय समितीत केला अथवा झाला. याचा अर्थ शरद पवार हे आता “इंडिया” आघाडीतल्या पहिल्या फळीतले नेते उरले नाहीत असा होतो आहे!!

    पवारांना वेगळ्या कोणाची असाइन्मेंट??

    त्याचबरोबर “इंडिया” आघाडीच्या समन्वय समितीत शरद पवारांनी हेतूतः स्वतःचीच वर्णी लावून घेऊन अन्य कोणाची तरी “वेगळी” असाइनमेंट कम्प्लीट करण्यासाठीच्या पुढचे पाऊल टाकले आहे का??, असाही दाट संशय राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

    I.N.D.I.A coordination committee incorporated sharad pawar’s name in it, it means he has not remained first level leader in alliance

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य