• Download App
    तलवार कशी फिरवायची हे मला ठाऊक, योग्य वेळी ती फिरवेन!!; मुख्यमंत्र्यांचा इशाराI know how to turn the sword, it will turn at the right time

    तलवार कशी फिरवायची हे मला ठाऊक, योग्य वेळी ती फिरवेन!!; मुख्यमंत्र्यांचा इशारा

    प्रतिनिधी

    मुंबई : सध्या आजारपणामुळे मी घरात आहे, पण म्हणून मी घराबाहेर पडण्यास असमर्थ आहे, असे नाही, मी शिवसेनाप्रमुखांचा पुत्र आहे, तलवार जरी माझ्या हातात नसली तरी ती कशी फिरवायची, ती कशी चालवायची हे मला चांगलेच माहिती आहे, योग्य वेळी ती मी चालवेन, अशा अप्रत्यक्ष इशारा शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. I know how to turn the sword, it will turn at the right time

    मुंबईत माझगाव येथील महाराणा प्रताप चौक येथे महाराणा प्रताप यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले. त्यावेळी ते बोलत होते. मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री असलम शेख, मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, महानगरपालिकेचे विविध पदाधिकारी, महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल उपस्थित होते.



    वीर महाराणा प्रताप यांचा पुतळा स्थापन केला आहे. आज शिवसेनाप्रमुख यांचा जन्मदिवस आहे. हा योगायोग आहे महाराणा प्रताप यांनी त्या काळात ज्या चेतना जागृत केल्या, तेच काम शिवसेनाप्रमुखांनी केले आहे. मी जरी घरात असलो, तरी बाहेर पडायला असमर्थ आहे असे नाही. हातात तालावर नसली तरी ती कशी गाजवायची हे मला ठाऊक आहे, तशी मी या आधीही फिरवलेली आहेच. प्रेरणा कुणापासून घ्यायची हे महत्वाचे आहे. ऐन मोक्याच्या ठिकाणी वीर पराक्रमी पुरुषांचे पुतळे बसवून तुम्ही मोठे काम केले. महाराणा प्रताप यांचा घोडा चेतक हा जखमी असतानाही चेतक याने महाराणा प्रताप यांना २२ फुटांच्या नाल्यावरून उडी मारून वाचवले आणि प्राण सोडले. इतका तो निष्ठावंत होता. नुसता पुतळा बांधून थांबू नका, हा आदर्श असाच पुढे न्या, असे आवाहनही मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले.

    I know how to turn the sword, it will turn at the right time

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Tejashwi Yadav : आता तेजस्वी यादव यांनी पंतप्रधान मोदींना लिहिले पत्र!

    Ganga Expressway : हवाई दलाने रचला विक्रम : गंगा एक्सप्रेसवेवर लढाऊ विमानांचे रात्रीचे लँडिंग

    Pahalgam attack : सावज दमल्यावर करतात शिकार, पाकिस्तान वाट पाहात असताना भारत उघडपणे का हल्ला करेल??