प्रतिनिधी
नवी दिल्ली : औरंगजेब आणि टिपू सुलतानवरून राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. याबाबत ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) नेते आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ओवैसी म्हणाले की, भारतात इतिहास बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे. मला मुघलांबद्दल प्रेम नाही पण इतिहास बदलला जात आहे. जणू लाल किल्ला मोदींनी बांधला होता.’I have no love for the Mughals, but history is being changed,’ Owaisi’s attack on the central government
ओवैसी पुढे म्हणाले, आज जर तुमच्याकडे टिपू सुलतानचा फोटो असेल तर तुमच्यावर गुन्हा दाखल केला जातोय. त्याच टिपू सुलतानचे चित्र भारतीय राज्यघटनेत आहे. औरंगजेबबाबत एआयएमआयएम नेते म्हणाले, आधी त्याचा फोटो पडताळून पाहा. 300 वर्षांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला, तो त्यांचा फोटो आहे असे कसे म्हणता येईल. ते म्हणाले, बाबरी आंदोलनाच्या वेळी ते आम्हाला बाबरची लेकरे म्हणायचे, आज आम्हाला औरंगबेजची लेकरे म्हटले जात आहे.
हिटलरच्या जर्मनीशी तुलना
ओवैसी म्हणाले की, आज आपण 1930 चा जर्मनी पाहत आहोत. ज्यूंच्या विरोधात अशीच द्वेषयुक्त भाषणे दिली जात होती. हिटलरच्या राजवटीतही चित्रपट बनवले गेले आणि आज काश्मीर फाइल्स आणि द केरळ स्टोरी भारतात बनत आहेत.
गोमांस, हिजाब आणि हलालच्या नावाखाली 9 वर्षांत मॉब लिंचिंग सुरू झाल्याचा आरोप AIMIM नेत्याने केला आहे. उत्तराखंडमधील अल्पसंख्याकांना हा परिसर रिकामा करण्यास सांगितले. त्यापैकी एक भाजपचा अल्पसंख्याक नेता होता, असा दावाही त्यांनी केला.
‘I have no love for the Mughals, but history is being changed,’ Owaisi’s attack on the central government
महत्वाच्या बातम्या
- Religious Conversion : ऑनलाइन गेमिंगद्वारे धर्मांतराचा सापळा रचणाऱ्या शाहनवाजला मुंबईतून अटक
- पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नितीश कुमार बाहेर, तर मग उरलेत किती??
- न घडलेल्या घटनेचे राजकारण करू नका! वारकऱ्यांची सुरक्षा महत्वाची – देवेंद्र फडणवीस
- आळंदीत लाठीमार झालेला नाही, देवेंद्र फडणवीसांचा स्पष्ट खुलासा