• Download App
    राजनाथ सिंग – अँटनी चर्चा काय झाली माहिती नाही, पण राहुलजी चीनशी सीमातंट्याचा विषय संसदेत काढणारच; मल्लिकार्जुन खर्गेंची स्पष्टोक्ती I donot have detailed info as to what did Defence Minister discuss We will get details but Rahul Gandhi also wants to raise China border in Parliament.

    राजनाथ सिंग – अँटनी चर्चा काय झाली माहिती नाही, पण राहुलजी चीनशी सीमातंट्याचा विषय संसदेत काढणारच; मल्लिकार्जुन खर्गेंची स्पष्टोक्ती

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली – संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी माजी संरक्षण मंत्री ए. के. अँटनी आणि शरद पवार यांच्याशी नेमकी काय चर्चा केली हे माहिती नाही. पण काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे चीनशी भारताच्या झालेल्या सीमातंट्याचा विषय संसदेत उपस्थित करणार आहेत, अशी माहिती राज्यसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज स्पष्ट केले. I donot have detailed info as to what did Defence Minister discuss We will get details but Rahul Gandhi also wants to raise China border in Parliament.

    राज्यसभेचे अध्यक्ष उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत मल्लिकार्जुन खर्गे हे उपस्थित राहिले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना वरील विधान केले.

    संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी यूपीए राजवटीच्या काळातले माजी संरक्षण मंत्री आणि काँग्रेसचे नेते ए. के. अँटनी यांच्याशी आणि शरद पवार यांच्याशी चर्चा केली होती. राजनाथ सिंग यांनी चीन सीमातंट्यावर काही माहिती दोन माजी संरक्षण मंत्र्यांना दिली होती.

    संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या तीन नेत्यांची भेट महत्त्वपूर्ण मानली जाते. त्या बद्दल मल्लिकार्जुन खर्गे यांना विचारले असता ते म्हणाले, राजनाथ सिंग यांनी अँटनी आणि पवारांशी नेमकी काय चर्चा केली याची माहिती नाही. पण चीनशी असलेल्या सीमातंट्याच्या मुद्द्यावर राहुल गांधी संसदेत चर्चा करतील. त्या वादाशी संबंधित आणि भारत – चीन गलवान हिंसक संघर्षाशी संबंधित सर्व मुद्दे आम्ही काँग्रेसचे सदस्य संसदेत उपस्थित करणार आहोत.

    मल्लिकार्जुन खर्गे हे राज्यसभेतले विरोधी पक्षनेते आहेत. अँटनी आणि शरद पवार यांच्यापेक्षा संसदेतला त्यांचे स्थान मोठे आहे. त्यामुळे मोदी सरकारच्या बाजूने जरी अँटनी आणि शरद पवार या दोन माजी संरक्षण मंत्र्यांना काही ब्रीफिंग करण्यात आले असले, तरी त्याचा काँग्रेसच्या संसदेत उपस्थित करण्याच्या मुद्द्यांवर काहीही फरक पडणार नाही, हेच खर्गे यांच्या वक्तव्यातून स्पष्ट होते आहे.

    I donot have detailed info as to what did Defence Minister discuss We will get details but Rahul Gandhi also wants to raise China border in Parliament.

    Related posts

    Indian Army : भारतीय लष्कराचा पाकिस्तानला कडक संदेश – “आम्हाला हवा तेव्हा, हवा तिथे हल्ला करू शकतो”

    Operation sindoor : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आजच्या संबोधनाकडे संपूर्ण जगाचे लक्ष!!

    Jaipur Police : जयपूरमध्ये महामार्गावर एका पिकअपमध्ये 2075 किलो स्फोटके सापडली; पोलिसांनी वाहन जप्त केले; तपास सुरू