• Download App
    Pegasus spyware issue; एच. डी कुमारस्वामींनी भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांना फोन टॅपिंगवरून घेरले|I am not surprised by today's revelations on phone tapping. The same issue had risen when my govt collapsed.

    Pegasus spyware issue; एच. डी कुमारस्वामींनी भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांना फोन टॅपिंगवरून घेरले

    विशेष प्रतिनिधी

    बेंगळुरू – Pegasus spyware issue वरून देशातले अख्खे राजकारण पेटले असताना प्रत्येक पक्षाचे नेते आपापल्या सोयीनुसार त्याच्यावर बोलून घेत आहेत. काँग्रेस आणि भाजपचे नेते एकमेकांवर संसदेत आणि बाहेरही तुटून पडत आहेत. पण कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी त्यामध्ये नवा ट्विस्ट आणला आहे.I am not surprised by today’s revelations on phone tapping. The same issue had risen when my govt collapsed.

    फोन टॅपिंग हा मुद्दा मूळात नवा नाही. सध्याच्या भाजप सरकारमध्येच नाही, तर आधीच्या विविध पक्षांच्या सरकारांच्या कारकिर्दीत देखील फोन टॅपिंग झाले आहे, अशा शब्दांमध्ये कुमारस्वामी यांनी भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना घेरले आहे.



    ते म्हणाले, फोन टॅपिंगची शंका माझे काँग्रेसच्या पाठिंब्यावरचे सरकार कोसळले तेव्हाही आली होती. अनेक नेत्यांनी ती शंका बोलून दाखविली होती. पण त्यावेळी त्या मुद्द्याकडे सोयीने दुर्लक्ष करण्यात आले. माझा पाठिंबा काढून घेणाऱ्या पक्षाला फोन टॅपिंगचा विषय समोर येणे रूचणारे नव्हते.

    आता भाजप सरकारच्या काळात काही पक्ष फोन टॅपिंग आणि हेरगिरीच्या विषयावर आक्रमकपणे बोलत आहेत. पण सध्याच्याच काय पण आधीच्या सरकारांच्या काळात देखील फोन टॅपिंग आणि सायबर हेरगिरी झालेली आहे. यामध्ये नवीन मुद्दा काहीही नाही, याकडे कुमारस्वामी यांनी लक्ष वेधले.

    I am not surprised by today’s revelations on phone tapping. The same issue had risen when my govt collapsed.

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    बिहारमध्ये परस्पर “तेजस्वी सरकारची” घोषणा; पण काँग्रेसच्या बरोबर महागठबंधनचा अद्याप ना आता, ना पता!!

    Sushma Andhare : सरन्यायाधीश भूषण गवई तुम्ही पापी आहात; सुषमा अंधारे यांचे खुले पत्र; RSSच्या कार्यक्रमाला नकार देता म्हणजे काय?

    64 आणि 74 वर्षांचे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री 35 वर्षांच्या नेत्याच्या घरी; बिहारमध्ये राहुलच्या कर्तृत्वाची वाचा कहाणी खरी!!