• Download App
    मी इतका मोठा माणूस नाही आणि माझे सरकार असे करणारही नाही, पाळत ठेवल्याच्या चर्चेवर केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंग पटेल यांनी केले स्पष्ट|I am not such a big man and my government will not do that, Union Minister Pralhad Singh Patel clarified on the issue of surveillance.

    मी इतका मोठा माणूस नाही आणि माझे सरकार असे करणारही नाही, पाळत ठेवल्याच्या चर्चेवर केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंग पटेल यांनी केले स्पष्ट

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पाळत ठेवण्याइतका मोठा माणूस मी नाही. माझे सरकार असे करणार नाही असे स्पष्ट करत पाळत ठेवल्याबाबतचे आरोप केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंग पटेल यांनी फेटाळून लावले आहेत.I am not such a big man and my government will not do that, Union Minister Pralhad Singh Patel clarified on the issue of surveillance.

    इस्रायलच्या स्पायवेअर पेगाससद्वारे मोबाईल फोन नंबर हॅक करण्यात आल्याच्या यादीत पटेल यांचेही नाव आले आहे. यावर ते म्हणाले, हे सॉफ्टवेअर केवळ सरकारांनाच विकले जाते. मोदी सरकार कधीही असे प्रकार करणार नाही. त्यामुळे विरोधी पक्षांनी संसदेत चर्चा करून काम चालू ठेवण्यास मदत करावी.



    माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पेगासस स्पायवेअर विषयावर सरकारची भूमिका ठामपणे स्पष्ट केली आहे. त्यामुळे मला या विषयावर स्वतंत्रपणे भाष्य करण्याची गरज नाही, असेही त्यांनी सांगितले.

    पेगासिस स्पायवेअरच्या माध्यमातून कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, भाजपचे मंत्री अश्विनी वैष्णव आणि प्रल्हादसिंग पटेल, माजी निवडणूक आयुक्त अशोक लवासा, रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्यासह अनेक पत्रकारांचे फोन टॅप केल्याचा आरोप करण्यत येत आहे.

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे आणि टीएमसीचे खासदार अभिषेक बॅनर्जी आणि भारताचे माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर लैंगिक छळ केल्याचा आरोप करणाऱ्या महिलेच्या निकटवर्तीयांवरही पाळत ठेवल्याचे म्हटले जात आहे.या आरोपाचा हेतू भारतीय लोकशाहीला बदनाम करणे हाच आहे असे म्हणत सरकारने हे आरोप फेटाळून लावले आहे.

    I am not such a big man and my government will not do that, Union Minister Pralhad Singh Patel clarified on the issue of surveillance.

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!