• Download App
    दीप्तिची कमाल, मायक्रोसॉफ्टमध्ये मिळविले वार्षिक दोन कोटी रुपयांचे पॅकेज|Hyedrabad girl Dipti got an annual package of Rs 2 crore acquired at Microsoft

    दीप्तिची कमाल, मायक्रोसॉफ्टमध्ये मिळविले वार्षिक दोन कोटी रुपयांचे पॅकेज

    हैद्राबादमधील एका इंजिनिअर मुलीला मायक्रोसॉफ्ट या जगातील आघाडीच्या सॉफ्टवेअर कंपनीने तब्बल दोन कोटी रुपयांचे वार्षिक पॅकेज दिले आहे. दीप्ति नारकुतीने नुकतेच आपले पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केले होते. तिने एमएस कम्प्यूटर्सचे शिक्षण यूनिवर्सिटी ऑ फ फ्लोरिडामधून पूर्ण केले आहे.Hyedrabad girl Dipti got an annual package of Rs 2 crore acquired at Microsoft


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: हैद्राबादमधील एका इंजिनिअर मुलीला मायक्रोसॉफ्ट या जगातील आघाडीच्या सॉफ्टवेअर कंपनीने तब्बल दोन कोटी रुपयांचे वार्षिक पॅकेज दिले आहे.

    दीप्ति नारकुतीने नुकतेच आपले पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केले होते. तिने एमएस कम्प्यूटर्सचे शिक्षण यूनिवर्सिटी ऑफ फ्लोरिडामधून पूर्ण केले आहे.कॅम्पस प्लेसमेंट दरम्यान दीप्तिीच्या उत्तरांनी मुलाखतकर्ते इतके प्रभावित झाले की तिला अनेक बड्या कंपन्यांकडून नोकरीच्या ऑफर आल्या होत्या.



    मायक्रोसॉफ्ट शिवाय, दीप्तिला गोल्डमॅन सॅक्स आणि अ‍ॅमेझॉनकडून जॉब ऑफर आली आहे. परंतु, तिनं मायक्रोसॉफ्टला पसंती दिली आहे.
    दीप्तिने हैदराबादमधील उस्मानिया कॉलेज आॅफ इंजीनियरिंग मधून बीटेक पूर्ण केले होते .

    फ्लोरिडा विद्यापीठात तिने पुढील शिक्षण घेतले. त्यानंतर ती अमेरिकेच्या निवेश बँक आणि आर्थिक सेवा कंपनी जेपी मॉर्गन मध्ये एक सॉफ्टवेयर इंजिनियर म्हणून काम केले होते. २०१४ ते २०१५ मध्ये मायक्रोसॉफ्ट स्टूडेंट असोसिएट म्हणून काम केले.

    दीप्तिचे वडील डॉ. वेंकन्ना हैदराबाद पोलीस आयुक्त कार्यालयात फॉरेन्सिक तज्ज्ञ आहेत. दीप्तिला फ्लोरिडा विद्यापीठात कॅम्पसमध्ये मुलाखती दरम्यान निवडलेल्या ३०० विद्यार्थ्यांपैकी सर्वात आकर्षक पॅकेज दिले आहे.

    तेलंगानाचे पोलीस महासंचालकांच्याअधिकृत ट्विटर हँडलवरून दीप्तिचे अभिनंदन केले आहे. या पोस्टमध्ये म्हटले की, एन. दीप्ति, डॉ. वेंकन्ना गारू (आमचे फोरेंसिक तज्ज्ञ) ला हार्दिक शुभेच्छा. २ कोटी रुपयांचे वार्षिक पॅकेज मिळाले आहे. या यशाबद्दल आम्हा हार्दिक शुभेच्छा. हा आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे.

    Hyedrabad girl Dipti got an annual package of Rs 2 crore acquired at Microsoft

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Elon Musk’s xAI Grok : मस्क यांच्या नव्या AI फीचरवरून वाद; शिव्यांचा वापर, युझर्सशी फ्लर्ट व कपडे काढताहेत AI-बॉटस

    Nimisha Priya निमिषा प्रियावर फाशीची टांगती तलवार कायम, येमेनमधील न्यायप्रक्रियेवर गंभीर प्रश्न

    Robert Vadra : मनी लाँड्रिंग प्रकरणात वाड्रा यांची 5 तास चौकशी; संजय भंडारीशी आर्थिक संबंधांवरून EDने घेतली झाडाझडती