वृत्तसंस्था
हैदराबाद : हैदराबादच्या प्रसिद्ध चारमिनार स्थित असलेले भाग्यलक्ष्मी मंदिर हे प्रत्यक्षात चारमिनार पेक्षा पुरातन आहे, असे प्रतिपादन केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी केले आहे. भाग्यलक्ष्मी मंदिरात जाऊन भाग्यलक्ष्मी मातेचे दर्शन ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज घेतले. त्यानंतर ते बोलत होते. Hyderabad’s Bhagyalakshmi Temple is older than the four minarets; Bhagyalakshmi’s Darshan by Jyotiraditya Shinde
हैदराबाद शहराविषयी बोलताना आपण नेहमी चारमिनारचा उल्लेख करतो. चारमिनार हैदराबाद शहराचे भूषण आहे असे म्हणतो. परंतु तिथले भाग्यलक्ष्मी मंदिर हे चारमिनार पेक्षा अधिक पुरातन आहे आणि भाग्यलक्ष्मी मंदिर ही हैदराबादची अधिक ठळक आणि पुरातन ओळख आहे. याकडे आपण लक्ष दिले पाहिजे, असे ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले.
ज्योतिरादित्य शिंदे यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात वादाला सुरुवात झाली असून अनेकांनी भाग्यलक्ष्मी मंदिराचा इतिहास किती पुरातन आहे, अशी बाजू मांडली आहे. तर अनेकांनी भाग्यलक्ष्मी मंदिर हे बेकायदेशीर अतिक्रमण असल्याचा दावा केला आहे. त्यावर काही नेटिजन्सनी भाग्यलक्ष्मी मंदिर हे बेकायदेशीर अतिक्रमण नसून बाबरी मशीद हे बेकायदेशीर अतिक्रमण होते. ते उध्वस्त करून तेथे आता पुरातन ठिकाणीच राम जन्मभूमी मंदिर उभे राहत आहे असे सुनावले आहे.
हैदराबादचे आधीचे नाव भाग्यनगर होते. ग्रामदेवता भाग्यलक्ष्मी वरूनच हे भाग्यनगर नाव आले असल्याचे अनेक इतिहासकार सांगतात. या पार्श्वभूमीवर ज्योतिरादित्य शिंदे यांनी देखील हैदराबादचे भाग्यलक्ष्मी मंदिर चारमिनार पेक्षा पुरातन असल्याचे सांगून राजकीय वर्तुळात वेगळी खळबळ उडवून दिली आहे.
हैदराबाद महापालिका निवडणुकीच्या वेळी देखील हैदराबाद की भाग्यनगर हा वाद गाजला होता. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रचाराच्या दौऱ्यात हैदराबाद महापालिकेत भाजपला बहुमत मिळाले तर हैदराबादचे नामांतर भाग्यनगर करण्याचे आश्वासन दिले होते. आता ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाग्यलक्ष्मी मंदिर हे चारमिनारपेक्षा पुरातन असल्याचे स्पष्ट करून भाग्यनगर नामांतराच्या दिशेने एक दमदार पाऊल टाकले असे मानण्यात येते.
Hyderabad’s Bhagyalakshmi Temple is older than the four minarets; Bhagyalakshmi’s Darshan by Jyotiraditya Shinde
महत्वाच्या बातम्या
- पुण्यातील 50 कोटींच्या शिक्षक भरती घोटाळ्याची ईडी चौकशी, बनावट कागदपत्रांच्या आधारे 23 जणांची भरती
- वार-पलटवार : राऊत म्हणाले- शिंदे गटाचे काही आमदार संपर्कात, शिंदे म्हणाले- राऊतांना सत्तांतराचे स्वप्न पाहू द्या!
- राष्ट्रपत्नी अश्लाघ्य टिपण्णी : काँग्रेस नेत्यांचे नेमके राजकीय – सामाजिक दुखणे काय??
- आदित्य ठाकरेंच्या शिवसंवादानंतर आता एकनाथ शिंदेंचा महाराष्ट्रात शक्तिप्रदर्शन दौरा!!