• Download App
    बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ घोंगावतेय; चार दिवसांत अंदमान निकोबारला धडकणार । Hurricane Hurricane in the Bay of Bengal; Andaman will hit Nicobar in four days

    बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ घोंगावतेय; चार दिवसांत अंदमान निकोबारला धडकणार

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ घोंगावत असून ते चार दिवसांत अंदमान निकोबारला धडकण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.  असनी, असे चक्रीवादळाचे नाव ठेवले आहे. हे २०२२ मधलं पहिलं चक्रीवादळ आहे. अंदमानला धडकल्यानंतर ते बांगलादेश आणि म्यानमारच्या दिशेने सरकेल.Hurricane Hurricane in the Bay of Bengal; Andaman will hit Nicobar in four days



    बंगालच्या उपसागराच्या आग्नेय भागात कमी दाबाचे क्षेत्र २१ मार्चपर्यंत चक्रीवादळात तीव्र होण्याची शक्यता आहे. या वादळामुळे काही भागात मुसळधार पावसाची शक्यता असून ढगाळ वातावरणामुळे उष्णता वाढण्याची शक्यता आहे. समुद्र किनारपट्टी भागात या वादळाचा परिणाम जास्त दिसून येणार आहे. समुद्र किनारपट्टी वगळून अन्य भागात त्याचा जास्त परिणाम दिसणार नाही. परंतु, त्यामुळे उष्णता आणखी वाढण्याची शक्यता आहे.
    येत्या शनिवारपर्यंत ते बंगालच्या उपसागराच्या आग्नेय भागात आणि अंदमान समुद्राच्या दक्षिणी भागात पसरण्याची शक्यता आहे. त्यानंतर, ते अंदमान आणि निकोबार बेटांच्या बाजूने आणि त्याच्या बाहेर जवळजवळ उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे.

    Hurricane Hurricane in the Bay of Bengal; Andaman will hit Nicobar in four days

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    President Murmu : राष्ट्रपती मुर्मूंनी पाणबुडी INS वाघशीरमधून प्रवास केला, असे करणाऱ्या दुसऱ्या राष्ट्रपती

    Lucknow : लखनौमध्ये शियांचे अधिवेशन, मौलाना म्हणाले- वंदे मातरमच्या नावाखाली घाबरवले जातेय, पाकसारखी वागणूक मिळतेय

    Mohan Bhagwat : भागवत म्हणाले- संघाचे ध्येय हिंदू समाजाला एकत्र करणे, सनातन धर्म पुन्हा जिवंत करण्याची वेळ आली आहे