विशेष प्रतिनिधी
श्रीनगर – पाकिस्तानातील वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएसच्या जागांची विक्री करून मिळालेला निधी काश्मिरमधील दहशतवादी कारवायांसाठी पुरविल्याचा आरोप हुरियत कॉन्फरन्सने फेटाळला. हुरियत नेते मिरवैझ उमर फारुक यांनी याबाबत निवेदन जारी केले आहे. Huriyat conference clears its stand on medical issue
यात त्यांनी म्हटले आहे, की पाकिस्तानातील वैद्यकीय व तांत्रिक शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्यासाठी काश्मिरी विद्यार्थ्यांकडून हुरियतच्या नेत्यांकडून पैसे घेतले जात असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला होता. याबाबतचे वृत्त प्रसारमाध्यमांत प्रसिद्ध झाले होते. मात्र, हुरियत हा आरोप पूर्णपणे फेटाळत आहे.
याआधी, रविवारी (ता. २२) बेकायदा कृत्ये (प्रतिबंधक) कायद्यानुसार हुरियतच्या गटांवर बंदी घातली जाण्याची शक्यता असल्याचा दावा संबंधित अधिकाऱ्यांनी केला होता. डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या काश्मिरी विद्यार्थ्यांकडून पाकिस्तानातील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्यासाठी हुरियतच्या गटांकडून पैसे घेतले जात असून, ही रक्कम जम्मू आणि काश्मिरातील दहशतवादी कारवायांसाठी पुरविली जात असल्याचे नुकत्याच केलेल्या चौकशीत निष्पन्न झाल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले होते.
Huriyat conference clears its stand on medical issue
महत्त्वाच्या बातम्या
- नाना पटोले यांनी पुन्हा एकदा काढली शिवसेनेची खोडी, राज्यात मुख्यमंत्री काँग्रेसचाच होणार असल्याचा पुनरुच्चार
- पदकविजेत्या दिव्यांगा खेळाडूंनी रस्त्यावर फेकून दिली पदके, आश्वासन पाळले नसल्याचा आरोप करत मुख्यमंत्री निवासासमोर आंदोलन करत आत्मदहनाचा इशारा
- शिवसेनेच्या जळगावच्या महापौर, उपमहापौरासह २५ जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा, भाजप कार्यालयात धक्काबुक्की करत सोडली डुकरे
- आणखी एक स्वदेशी कोरोन लस, पुण्यातील जेनोव्हा बायोफार्मास्युटिकल्सला दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्यातील क्लिनिकल ट्रायलला परवानगी