विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – गेल्या तीन दशकांत मानवी हस्तक्षेपामुळे उष्णतेशी संबंधित एकूण मृत्युंपैकी एक तृतीयांश मृत्यू हवामान बदलामुळे झाल्याचा दावा करण्यात आला आहे. मानवी हस्तक्षेपामुळे होणाऱ्या हवामान बदलातून उष्णतेमुळे होणारे मृत्यू वाढत असल्याचे संशोधन पहिल्यांदाच केल्याचा संशोधकांचा दावा आहे. Human intervention causes the majority of deaths due to climate change
अलीकडच्या काही उन्हाळ्यांत उष्णतेशी संबंधित मृत्यूंपैकी ३७ टक्के मृत्यू झाले. यापैकी मध्य आणि दक्षिण अमेरिकेत सर्वाधिक मृत्यू झाले. इक्वेडोर किंवा कोलंबियात ७६ टक्के मृत्यूंची नोद झाली. दक्षिण-पूर्व आशियात हेच प्रमाण ४८ ते ६१ टक्क्यांदरम्यान आहे. भविष्यातील तापमानवाढीचा धोका लक्षात घेता ठोस धोरण आखण्याची गरज या संशोधनातून व्यक्त झाली आहे. उष्माघाताच्या दुष्परिणामांपासून लोकांचे रक्षण करण्यासाठी वेळीच हस्तक्षेप करण्याची गरज असल्याचेही संशोधकांचे मत आहे.
नेचर क्लायमेट चेंज या नियतकालिकात हे संशोधन प्रकाशित झाले आहे. ब्रिटनमधील लंडन स्कूल ऑफ हायजिन ॲंड ट्रॉपिकल मेडिसिन आणि स्वित्झर्लंडमधील बर्न विद्यापीठातील संशोधकांनी हे संशोधन केले. त्यांनी ४३ देशांतील ७२३ ठिकाणांच्या याबाबतच्या माहितीचा वापर केला.