वृत्तसंस्था
वॉशिंग्टन : अमेरिकन अंतराळ संस्था नासाच्या शास्त्रज्ञाने दावा केला आहे की, 2030 सालापर्यंत मानव चंद्रावर राहून काम करू शकेल. अतंराळात अनेक रहस्य आहेत. ही उलगडण्यासाठी अनेक अवकाश संशोधन संस्था प्रयत्न करत आहेत. तसेच, पृथ्वी व्यतिरिक्त इतर ग्रहांवर मानवाला राहता येईल का याबाबतही संशोधन सुरू आहे. त्यातच आता 2030 पर्यंत मानव चंद्राच्या पृष्ठभागावर राहू शकेल, असा दावा केला आहे. Human habitation on the Moon by 2030; NASA’s Orion spacecraft project chief claims
आर्टेमिस-1 मोहिमेंअतर्गत चंद्राच्या दिशेने सोडण्यात आलेल्या ओरियन स्पेसक्राफ्ट कार्यक्रमाचे प्रमुख हाॅवर्ड हू यांनी सांगितले की, आम्ही पुढील 8 वर्षांमध्ये चंद्राच्या पृष्ठभागावर माणसांना पाठवणार आहोत. हे लोक तिथे जाऊन वैज्ञानिक प्रयोग करतील.
2030 पर्यंत मानव चंद्रावर राहू शकेल
नासाने अलीकडेच आपल्या शक्तिशाली स्पेस लाॅन्च सिस्टम राॅकेटद्वारे ओरियन अतंराळयान चंद्राच्या दिशेने पाठवले आहे. ओरियन अंतराळयान सध्या चंद्राभोवती प्रदक्षिणा घालत आहे. या उपग्रहाचे प्रक्षेपण अनेकवेळा पुढे ढकलले गेले होते. त्यानंतर गेल्या आठवड्यात ते लाॅंच करण्यात आले. सुमारे 50 वर्षांनंतर नासा चंद्राच्या दिशने मानवी मोहिम सुरु करत आहे. सध्या जे ओरियन अंतराळयान चंद्राभोवती फिरत आहे, त्यामध्ये मानव नाही. पण त्याच अंतराळयानातून भविष्यात मानवाला चंद्रावर पाठवले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
Human habitation on the Moon by 2030; NASA’s Orion spacecraft project chief claims
महत्वाच्या बातम्या
- बुद्धिवादी राष्ट्रवादी नेता हीच सावरकरांची खरी ओळख; दिल्लीच्या ‘प्रेस कॉन्फरन्स’मध्ये रणजित सावरकरांचे रॅपिड फायर
- ITBP Recruitment : इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्समध्ये नोकरीची संधी, करा अर्ज
- Imam Remuneration : मशिदींच्या इमामांना करदात्यांच्या पैशातून वेतन हे संविधानाचे हनन; केंद्रीय माहिती आयुक्तांचा निर्णय