वृत्तसंस्था
न्यूयॉर्क : अमेरिकेच्या न्यूयॉर्क आणि न्यूजर्सी राज्यात इदा चक्रीवादळामुळे हाहा:कार माजवला आहे. दोन्ही राज्यात ८ जणांचा मृत्यू झाला असून सुमारे दीड लाखाहून अधिक घरांची बत्ती गुल झाली आहे. Huge loss due to cyclone in USA
अमेरिकेला वादळे नवीन नाहीत. त्यामुळे वादळाशी मुकाबला करण्यासाठी तेथे आपत्कालीन यंत्रणा नेहमी सज्ज असते. मात्र यावेळची परिस्थीती थोडी भिषण असल्याचे अधिकाऱ्यांचे मत आहे.
न्यूयॉर्क शहरात एकाच कुटुंबातील चौघांचा बुडून मृत्यू झाला. ते तळाघरात फसले होते आणि त्यांना बाहेर येता आले नाही. या शहरात एका तासात ३.२४ इंच पाऊस झाल्यानंतर विमानतळावर पाणी साचले आहे. न्यूयॉर्कच्या नेव्हार्क लिबर्टी विमानतळावरची सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
पेसिल्वेनिया येथे एक लाख घराची तर न्यूजर्सीच्या ५० हजार घरातील वीज गुल झाली. फिलाडेफ्लिया आणि उत्तर न्यू जर्सीत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Huge loss due to cyclone in USA
महत्त्वाच्या बातम्या
- सावधान : आता वर्क फ्रॉम होममध्ये सिगारेट पिण्यावर बंदी
- मुख्य मंदिरामध्येच होणार यंदा ‘दगडूशेठ’ चा गणेशोत्सव; सलग दुस-या वर्षी उत्सवाची परंपरा खंडित
- राष्ट्रवादीच्या स्थायी समिती सदस्यांवर होणार कारवाई, पालकमंत्र्यांसमोरच घेतली जाणार हजेरी
- AARAMBH AURANGABAD : आरंभ ‘त्यांच्या’ भविष्याचा…!आरंभ ‘त्यांच्या’ विश्वाचा…आरंभ ‘त्यांच्या’ संगोपनाचा…आरंभ ‘अंबिकेच्या’ जिद्दीचा…चला भेटूया विशेष मुलांच्या मातेला!