यामुळे सीमावर्ती भागात घुसखोरीविरोधी यंत्रणा मजबूत होईल, असंही म्हणाले
विशेष प्रतिनिधी
जम्मू-काश्मीर : उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी सांगितले की पुढील आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये, सुरक्षेशी संबंधित कामांसाठी 1200 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम मंजूर करण्यात आली आहे ज्यामध्ये 42 नवीन सीमा पोलिस चौक्या बांधल्या जातील. यामुळे सीमावर्ती भागात घुसखोरीविरोधी यंत्रणा मजबूत होईल.Huge funds available from the government for border security of the country Manoj Sinha
उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी रविवारी जम्मू आणि काश्मीरसाठी 2024-25 च्या अर्थसंकल्पातील विविध पैलूंची रूपरेषा मांडली. ते म्हणाले की, महसूल आणि भांडवली खर्चांतर्गत 1284.45 कोटी रुपये सुरक्षा संबंधित कामांसाठी ठेवण्यात आले आहेत. यासह सीमाभागातील लोकांसाठी 1218 सामुदायिक आणि वैयक्तिक बंकर बांधले जातील.
या प्रकल्पामध्ये पोलिस स्टेशन, पोलिस चौक्या, पोलिस गृहनिर्माण संकुल येथे पायाभूत सुविधा निर्माण करणे याशिवाय आंतरकार्यक्षम फौजदारी न्याय प्रणाली लागू करणे समाविष्ट आहे. सुशासन, तळागाळातील लोकशाही बळकट करणे, शाश्वत कृषी विकास, जम्मू-काश्मीरमध्ये गुंतवणुकीचे वातावरण निर्माण करणे यावर अर्थसंकल्पाचा भर असल्याचे ते म्हणाले.
सुशासन अंतर्गत, सर्व पंचायती आणि कार्यालये ई-ऑफिसशी जोडली जातील. भांडवली खर्चाअंतर्गत ५०३८ कोटी रुपये पाणीपुरवठा आणि सिंचनासाठी, ३७३०.८३ कोटी रुपये ग्रामीण विकास आणि पंचायती राजसाठी, २०२९.९५ कोटी रुपये कृषी आणि संलग्न क्षेत्रासाठी आहेत. अशी माहितीही उपराज्यप मनोज सिन्हा यांनी दिली.
Huge funds available from the government for border security of the country Manoj Sinha
महत्वाच्या बातम्या
- महिला – मुलांना ढाल बनवून मुस्लिमांनी रचली हल्दवानी हिंसाचाराची मोडस ऑपरेंडी; वाचा जखमी कर्मचाऱ्याची जबानी!!
- मिथुन चक्रवर्तींना छातीत दुखू लागल्याने केले रुग्णालयात दाखल
- EPFO: 2023-24 साठी व्याजदर निश्चित, खातेदारांना आता इतका परतावा मिळेल
- लोकसभा निवडणुकीपूर्वी अमित शाहांची मोठी घोषणा, देशभरात CAA लागू होणार