• Download App
    इराक विद्यापीठाच्या वसतिगृहाला भीषण आग ; १४ जणांचा मृत्यू, १८ जणांची प्रकृती गंभीर|Huge fire at the dormitory of the University of Iraq 14 people died 18 people are in critical condition

    इराक विद्यापीठाच्या वसतिगृहाला भीषण आग ; १४ जणांचा मृत्यू, १८ जणांची प्रकृती गंभीर

    • सरकारी माध्यमांनी मृतांच्या संख्येला दुजोरा दिला आहे.

    विशेष प्रतिनिधी

    इराकच्या उत्तरेकडील शहर एरबिलमधील विद्यापीठाच्या वसतिगृहाला लागलेल्या आगीत किमान १४ जणांचा मृत्यू झाला आणि १८ जण जखमी झाले. ही घटना शुक्रवारी (८ डिसेंबर) सायंकाळी घडली.Huge fire at the dormitory of the University of Iraq 14 people died 18 people are in critical condition



     

    सोरानच्या आरोग्य संचालनालयाचे प्रमुख कामराम मुल्ला मोहम्मद यांनी दिलेल्या माहितीनुसार, एरबिलच्या पूर्वेकडील सोरान या छोट्या शहरातील एका इमारतीत आग लागली. सरकारी माध्यमांनी मृतांच्या संख्येला दुजोरा दिला आहे. स्थानिक वृत्तसंस्थेने सांगितले की, शुक्रवारी रात्री उशीरा आग विझवण्यात आली.

    एवढी भीषण आग नेमकी कशामुळे लागली त्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या घटनेमागची कारणे तपासली जात आहेत. या अपघातात १८ विद्यार्थी जखमी झाल्याचे वृत्त आहे. सर्वांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघाताने सर्वांनाच धक्का बसला आहे. या घटनेने सोरान विद्यापीठातील सर्व शिक्षक व विद्यार्थी दुखावले आहेत.

    Huge fire at the dormitory of the University of Iraq 14 people died 18 people are in critical condition

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार