• Download App
    सप्ततारांकीत हॉटेल उभे करण्यासाठी ६३ झाडे तोडल्याबद्ल उद्योजकाला ४० कोटींचा दंड। Huge fine for tree cutting

    सप्ततारांकीत हॉटेल उभे करण्यासाठी ६३ झाडे तोडल्याबद्ल उद्योजकाला ४० कोटींचा दंड

    विशेष प्रतिनिधी

    कोलकता : साचलेले पाणी काढायच्या नावाखाली ६३ वृक्ष तोडल्याप्रकरणी कलकत्ता उच्च न्यायालयाने उद्योजक सौमित्र कांती डे यांना तब्बल ४० कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. २०१७ मध्ये या प्रकरणी गुन्ह्याची नोंद झाली होती. Huge fine for tree cutting

    संबंधित जागेवर सप्ततारांकीत हॉटेल उभे करण्याचा डे यांचा विचार असल्याचा दावाही सरकारने केला होता. वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचे कायमस्वरुपी नुकसान झाल्याचे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने संबंधित व्यक्तीला १५ दिवसांत ४० कोटी रुपयांचा दंड ठोठावला असून, ज्या ठिकाणी वृक्षतोड केली त्याचठिकाणी १०० झाडे लावण्याचा आदेश दिला आहे.



    खासगी मालमत्तेच्या आवारात साचलेले पाणी काढून टाकण्याची कोलकता महापालिकेकडून नोटीस मिळाल्याने पाणी काढण्यासाठी झाडे तोडावी लागली, असा दावा डे यांनी केला होता. मात्र, पाणी काढून टाकण्याचा आणि वृक्षतोडीचा काहीही संबंध नव्हता, असा दावा पश्चिकम बंगाल सरकारने केला होता.

    Huge fine for tree cutting

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Delhi Turkman Gate : दिल्लीत मध्यरात्री पोलीस-MCD पथकावर दगडफेक; मशिदीजवळ अवैध बांधकाम हटवण्यासाठी पोहोचले होते

    Election Commission : 12 राज्यांमध्ये SIR- मसुदा यादीत 13% मतदार कमी झाले; UP मध्ये सर्वाधिक 2.89 कोटी मतदार यादीतून वगळले

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले- रस्ते भटक्या कुत्र्यांपासून मोकळे करणे आवश्यक; ते अपघातांना कारणीभूत