विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशातील ३ कोटी गरीबी लोकांना पक्की घरे देऊन त्यांना लखपती बनवले आहे. नळाचे पाणी ९ कोटींपेक्षा जास्त नळजोडण्या दिला आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले.How to make three crore people in the country millionaires, said the Prime Minister
पंतप्रधान म्हणाले, गेल्या ७ वर्षात आपल्या सरकारने ३ कोटी गरीबांना पक्की घरे देऊन त्यांना लखपती बनवले आहे. आता नळाचे पाणी जवळपास ९ कोटी ग्रामीण घरांपर्यंत पोहोचू लागले आहे. यापैकी गेल्या दोन वर्षांत जलजीवन अभियानांतर्गत ५ कोटींहून अधिक नळजोडण्या देण्यात आल्या आहेत.
यावर्षी सुमारे ४ कोटी ग्रामीण कुटुंबांना नळजोडणी देण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. देश मागील १०० वर्षात आलेल्या सर्वात मोठ्या महामारीशी लढत आहे. कोरोना व्हायरस महामारी जगासमोर अनेक आव्हानं घेऊन आली. यापुढे आपण जे जग पाहणार आहोत ते तसं नसणार जसं आपण कोरोना महामारीपूर्वी पाहत होतो.
कोरोनानंतर एक नवीन वर्ल्ड ऑर्डर बनणार आहे. त्याचे संकेतही दिसत आहे. आज भारताकडे पाहण्याचा जगाच्या दृष्टीकोनात मोठा बदल झाला आहे. आता जगातील लोकं भारताकडे अधिक मजबूत रुपाने पाहत आहे. त्यासाठी आपल्या देशाला वेगाने पुढे नेणं आपल्यासाठी गरजेचे आहे. हा काळ नव्या संधी आणि नव्या संकल्पना यांना पुढे घेऊन जाणारा आहे.
How to make three crore people in the country millionaires, said the Prime Minister
महत्त्वाच्या बातम्या
- ज्येष्ठ अभिनेते रमेश देव कालवश; ब्लॅक अँड व्हाईट ते डिजिटल सिनेमापर्यंत अनुभवला चित्रपटसृष्टीचा प्रवास!!
- अर्थसंकल्पावर उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले –क्रिप्टोकरन्सीवरील करामुळे मुंबईचे मोठे नुकसान
- मोठी बातमी : संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना ईडीकडून अटक, १०३४ कोटींच्या घोटाळ्याचा आरोप
- राष्ट्रगीताचा अपमान : मुंबई न्यायालयाने ममता बॅनर्जींना बजावले समन्स, २ मार्चला हजर राहण्याचे निर्देश