• Download App
    सोशल मीडियावर तक्रार अधिकाऱ्याची नियुक्ती : युजर्सच्या सांगण्यावरून व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकला आक्षेपार्ह पोस्ट हटवावी लागणार; अशी करा तक्रार । How To Complaint On Social Media to Grievance Officer, WhatsApp, Facebook, Twitter Controversial Content

    सोशल मीडियावर तक्रार अधिकाऱ्याची नियुक्ती : युजर्सच्या सांगण्यावरून व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकला आक्षेपार्ह पोस्ट हटवावी लागणार; अशी करा तक्रार

    How To Complaint On Social Media : देशातील सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नवीन सायबर माहिती तंत्रज्ञान (आयटी) नियम लागू झाले आहेत. आता तक्रार अधिकारी सोशल मीडिया व्यासपीठावर ठेवणे आवश्यक झाले आहे. व्हॉट्सअ‍ॅप आणि ट्विटरनेही तक्रार अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. नवीन नियमांनुसार, 5 दशलक्षाहून अधिक वापरकर्ते असलेल्या सोशल प्लॅटफॉर्मवर तक्रार अधिकारी, नोडल ऑफिसर आणि मुख्य अनुपालन अधिकारी असणे गरजेचे आहे. हे सर्व जण भारताचे रहिवासी असले पाहिजेत. How To Complaint On Social Media to Grievance Officer, WhatsApp, Facebook, Twitter Controversial Content


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : देशातील सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नवीन सायबर माहिती तंत्रज्ञान (आयटी) नियम लागू झाले आहेत. आता तक्रार अधिकारी सोशल मीडिया व्यासपीठावर ठेवणे आवश्यक झाले आहे. व्हॉट्सअ‍ॅप आणि ट्विटरनेही तक्रार अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. नवीन नियमांनुसार, 5 दशलक्षाहून अधिक वापरकर्ते असलेल्या सोशल प्लॅटफॉर्मवर तक्रार अधिकारी, नोडल ऑफिसर आणि मुख्य अनुपालन अधिकारी असणे गरजेचे आहे. हे सर्व जण भारताचे रहिवासी असले पाहिजेत.

    माहिती तंत्रज्ञान कायदा २०००च्या अंतर्गत वापरकर्त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी अधिकाऱ्याची नेमणूक करणे आवश्यक आहे. त्याला ग्रीव्हान्स ऑफिसर म्हणतात. फ्लिपकार्ट, फेसबुक, गो एयर, एचडीएफसी बँक, पेटीएम, जिओ मोबाइल यासारख्या अनेक कंपन्यांनी या कामासाठी तक्रार अधिकारी नियुक्त केले आहेत.

    भारतात कोणत्या कंपन्यांनी ग्रीव्हान्स ऑफिसची नेमणूक केली आहे, याची माहिती आपण grievanceofficer.com वेबसाइटला भेट देऊन घेऊ शकता. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म, एअरलाइन्स कंपनी, बँक, टेलिकॉम यासह इतर अनेक कंपन्यांच्या ग्रीव्हान्स ऑफिसर्सची यादी येथे आहे.

    युजरला काय होईल फायदा?

    आयटीच्या नवीन नियमांनुसार कंपन्यांना तक्रार अधिकारी आणि त्यांच्याशी संपर्क साधण्याचे संपूर्ण तपशील स्पष्टपणे सांगावे लागतील. म्हणजेच, अधिकाऱ्याचा संपर्क क्रमांक, तक्रार करण्याची प्रक्रिया सांगावी लागेल. जेव्हा एखाद्या युजरने तक्रार केली तर अधिकाऱ्याला 24 तासांच्या आत तक्रार मिळाल्याची पुष्टी करावी लागेल. तक्रार मिळाल्यापासून 15 दिवसांच्या आत समाधान करावे लागेल. वापरकर्त्याने कोणत्याही कंटेंटवर आक्षेप नोंदविला असेल तर तो त्या व्यासपीठावरून 36 तासांच्या आत काढून घ्यावा लागेल. त्याच वेळी, अश्लील साहित्य आणि नग्नता असलेला कंटेंट 24 तासांच्या आत हटवावा लागेल.

    अशी करा तक्रार

    1. व्हॉट्सअ‍ॅपवर तक्रार देण्याची प्रक्रिया

    व्हॉट्सअ‍ॅपच्या ब्लॉगनुसार व्हॉट्सअ‍ॅपच्या अटी, पेमेंट आणि त्यांच्या इतर प्रश्नांबाबत भारतीय युजर कंपनीच्या तक्रार अधिकाऱ्याकडे तक्रार करू शकतात. यासाठी या प्रक्रियेचे अनुसरण करा…

    Settings > Help > Contact Us Settings > Payments > Help Settings > Payments > Payments History > Transaction Details > Help, या payment message > Transaction Details, किंवा 1800-212-8552 नंबरवर सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत कॉल करा.

    तुम्ही पोस्टच्या माध्यमातूनही ग्रीव्हान्स ऑफिसरपर्यंत आपली तक्रार पोहोचवू शकता. यासाठी या अॅड्रेसवर पोस्ट करा.

    परेश बी. लाल, वॉट्सअप (ग्रीव्हान्स ऑफिसर), पोस्ट बॉक्स नंबर-56, रोड नंबर-1, बंजारा हिल्स, हैदराबाद- 500 034, तेलंगण, भारत.

    2. ट्विटरवर अशी करा तक्रार

    जर तुम्हाला ट्विटरवर एखादी पोस्ट अथवा कंटेंटवरून आक्षेप असेल आणि तुम्हाला ती पोस्ट हटवण्याची वा त्याविरुद्ध कारवाईची इच्छा असेल तर त्यासाठी अशी तक्रार करा…

    यूजर legalrequests.twitter.com/forms/landing_disclaimer वर जाऊन आपले नाव आणि ईमेल अॅड्रेस टाकावा. यानंतर युजर आपली तक्रार येथे रजिस्टर करू शकतात. किंवा आपली तक्रार grievance-officer-in@twitter.com वर मेल करू शकतात. याशिवाय तुम्ही आपल्या पोस्टच्या माध्यमातूनही ग्रीव्हान्स ऑफिसरपर्यंत आपली तक्रार पोहोचवू शकतात. यासाठी या अॅड्रेसवर पोस्ट करा.

    धर्मेंद्र चतुर, 4th फ्लोअर, द एस्टेट, 121, डिकेंसन रोड, बंगळुरू- 560 042, कर्नाटक, भारत.

    3. फेसबुकवर अशी करा तक्रार

    फेसबुक यूजर्सही आपली तक्रार ग्रीव्हान्स ऑफिसरला करू शकतात. यासाठी त्यांना अनेक प्रकारचे प्लॅटफॉर्म दिले जात आहेत. युजर www.facebook.com/help/contact/278770247037228?helpref=faq_content या लिकंवर जाऊन येथे दिलेल्या प्रश्नांना निवडत आपली तक्रार नोंदवू शकतात. तुम्ही तक्रारीला FBGOIndia@fb.com वर ईमेलही करू शकतात. याशिवाय युजर पोस्टच्या माध्यमातूनही भारत आणि अमेरिकेत आपली तक्रार नोंदवू शकतात. तक्रारी या अॅड्रेसवर पोस्ट करा.

    स्पूर्ति प्रिया, 216 ओखला इंडस्ट्रियल एस्टेट, पेज III, नवी दिल्ली – 110020.
    किंवा
    जुली डुवैल, फेसबुक इंक. (ग्रीवांस ऑफिसर), 1 हैकर वे, मेनलो पार्क, सीए 94025, यूएसए.
    ईमेल : svc-GO-India@fb.com

    How To Complaint On Social Media to Grievance Officer, WhatsApp, Facebook, Twitter Controversial Content

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    West Bengal : पश्चिम बंगालला बांगलादेशचे लाइट व्हर्जन बनवले; सुकांता मजुमदार यांचा ममता बॅनर्जींवर आरोप

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!

    Murshidabad : मुर्शिदाबाद हिंसेत वडील-मुलाच्या हत्येप्रकरणी चौथी अटक; आरोपींनी मृताच्या घराची तोडफोड केली