विशेष प्रतिनिधी
मुबंई : जगभर पून्हा ओमीक्रोन व्हारसमुळे चिंता वाढलेली आहे. बऱ्याच देशांनी आफ्रिकेतू येणाऱ्या विमानांवर बंदी घालण्यास सुरुवात केली आहे. तर पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आफ्रिकेतुन भारतात आलेल्या प्रवाशांचा आकडा सांगितला आहे. आणि हा आकडा भीतीदायक नक्कीच आहे. 10 नोव्हेंबर पासून एकूण 1000 प्रवासी दक्षिण आफ्रिकेतून भारतात दाखल झाले आहेत असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे. हा आकडा नक्कीच चिंताजनक आहे.
How many migrants have arrived in India from South Africa since November 10?
ह्या 1000 लोकांपैकी बरेच लोक मुबंई बाहेर गेलेले आहेत. काही मुंबई मध्येच आहेत. ह्या सर्व लोकांना ट्रॅक करण्यात येणार असल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.
Omicron चे चीन कनेक्शन काय? WHOने कोरोनाच्या नवीन प्रकाराचे नाव हेच का ठेवले? वाचा सविस्तर..
ह्या व्हायरसची बाधा झालेल्या पेशन्ट मध्ये तीव्र लक्षणे दिसून आली नाहीयेत असे डॉ. अँजेलीक कोएतजी यांनी सांगितले आहे. 30 वर्षीय तरुणा मध्ये हा व्हायरस आढळून आला होता. डोकेदुखी, संपूर्ण शरीरात वेदना, प्रचंड थकवा ही लक्षणे त्याच्यामध्ये होती. कोरोनाची बाधा झाल्यास घशात खवखवणे, चव, वास घेता न येणे ह्या सारख्या समस्या ओमीक्रोन मध्ये दिसून येत नाहीयेत. ह्या व्हायरसची लक्षणे कोणती ह्याचा अभ्यास करण्यास अधिकाधिक पेशंटचा अभ्यास करावा लागणार आहे असे डॉ. अँजेलीक कोएतजी यांचे म्हणणे आहे.
How many migrants have arrived in India from South Africa since November 10?
महत्त्वाच्या बातम्या
- IB Alert : संसदेला घेराव आणि खलिस्तानी झेंडा फडकवण्याचा कट, पोलीस-गुप्तचर यंत्रणा सतर्क
- जम्मू-काश्मिरात निरपराध नागरिकांच्या हत्या करणाऱ्या सर्व दहशतवाद्यांचा खात्मा, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
- यूपी सरकारला “बैल” म्हणून घेतलेत; पण योगींच्या बुलडोझरची भीती अखिलेशना का वाटते??
- धक्कादायक! सामान्यांना लसीकरणाची सक्ती-मुंबईत मात्र १ लाख फ्रंटलाईन वर्कर्सचेच लसीकरण नाही …