• Download App
    बस कंडक्टरचा मुलगा 'कसा' बनला आयपीएल फ्रँचायझीचा मालक? 2800 कोटींची आहे मालमत्ता How did the bus conductor's son become the owner of the IPL franchise? Assets worth Rs 2,800 crore

    Raj Kundra Case : बस कंडक्टरचा मुलगा ‘कसा’ बनला आयपीएल फ्रँचायझीचा मालक? 2800 कोटींची आहे मालमत्ता

    राज कुंद्रा हे एक मोठे बिझनेस मॅन म्हणून ओळखले जातात. मात्र सध्या पोर्नशी संबंधित प्रकरणे समोर आली आहेत. या घटनांमुळे ते सध्या चर्चेत आलेले आहेत.त्याचबरोबर त्यांच्या अडचणीत देखील भर पडली आहे. How did the bus conductor’s son become the owner of the IPL franchise? Assets worth Rs 2,800 crore


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई :– बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी सध्या चित्रपटांमध्ये आपल्याला दिसत नसली तरी, ती तिच्या फिटनेस मूळ आणि योगामुळे सतत चर्चेत असते. नुकतेच तिचे पती राज कुंद्रा हे पोर्नशी संबंधित काही प्रकरणामुळे अडचणीत सापडले आहेत. राज कुंद्रा हे एक मोठे बिझनेस मॅन म्हणून ओळखले जातात. मात्र सध्या पोर्नशी संबंधित प्रकरणे समोर आली आहेत. या घटनांमुळे ते सध्या चर्चेत आलेले आहेत.त्याचबरोबर त्यांच्या अडचणीत देखील भर पडली आहे. राज कुंद्रा यांना 23 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पॉर्न संदर्भात ते रॅकेट असल्याचं समोर आल आहे. या सर्व गोष्टी ते मोबाईल ॲप आणि काही गुगलच्या साईटवर अपलोड करत होते असा आरोप त्यांच्यावर आहे.



    वयाच्या 18 व्या वर्षी वडिलांच्या अल्टिमेटमनंतर राज कुंद्रा 2000 डॉलर घेऊन दुबईला गेलेभोते आणि तेथे त्यांनी हिरा व्यापाऱ्यांची भेट घेतली. पण यांच्यात त्यावेळी सौदा झाला नाही. दरम्यान, राज यांना काही कामानिमित्त नेपाळला जावे लागले. तिथे फिरताना राजला पश्मिना शाल दिसली. तिथे या शाल अत्यंत कमी किंमतीला विकल्या जात होत्या. पण राजला हे समजलं की या शालींना नॅशनल मार्केट मध्ये मोठ्या प्रमाणावर मागणी मिळेल आणि चढ्या भावाने आपण याची विक्री करू शकतो. हे लक्षात घेत राजने 100 हून अधिक शाल विकत घेतल्या आणि लंडनला गेले. या शाली तिथल्या मार्केट मध्ये मोठ्या प्रमाणावर विकल्या गेल्या आणि तिथं या शालींना मार्केट तर मिळालंच परंतु तिथं त्या एक प्रकारचा ब्रँड म्हणून पण ओळखू जाऊ लागल्या. त्याचबरोबर या शाल इंग्लंडमध्ये फॅशन ट्रेंड झाल्या.

    त्यावर्षी कुंद्राची उलाढाल 2 लाख युरोपर्यंत गेली. तेही फक्त शाल विकून, पण एखादी चांगली गोष्ट चालू असल्याचे पाहून त्याची डुप्लिकेट प्रत बाजारात येण्यास फारसा वेळ लागला नाही. बनावट वस्तू आणि दर्जा खसरल्यामुळ नाव खराब होऊ लागल आणि व्यवसाय बुडाला. यानंतर कुंद्राने शालचा व्यवसाय सोडून दुबईला जाऊन डायमंडची कामे करण्यास सुरुवात केली.

    अशाप्रकारे आयपीएलमध्ये प्रवेश

    2009 मध्ये, राज कुंद्रा मॉरीशस कंपनीच्या मदतीने राजस्थान रॉयल्सचा मालक झाला. मीडिया रिपोर्टनुसार राजस्थान रॉयल्समध्ये त्याने 11.7 टक्के हिस्सा 75 कोटी रुपयांना खरेदी केला. राज आयपीएलमध्ये सामील झाल्यानंतर त्यांना बर्‍याच अडचणींना तोंड द्यावं लागलं. आणि आयपीएलचा प्रवास जास्त काळ टिकू शकला नाही.

    सट्टेबाजीच्या आरोपावरून पोलिसांनी त्याला अटक केली आणि चौकशी दरम्यान त्याने कबूल केले की त्याने आपल्या संघावर सट्टा लावला आणि सट्टेबाजीत बरेच पैसे गमावले. फिक्सिंग घोटाळ्यानंतर राज कुंद्रावर आयपीएलमधून आजीवन बंदी घालण्यात आली होती.

    How did the bus conductor’s son become the owner of the IPL franchise? Assets worth Rs 2,800 crore

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य