विशेष प्रतिनिधी
मुबंई : शाहरुख खानच्या रईस या सिनेमामध्ये एक डायलॉग होता. ‘कोई धंदा बडा या छोटा नही होता, अम्मी जान केहेती है’. हे सांगण्याचा उद्देश असा की, नुकताच अभिनेत्री स्वरा भास्कर हिला ट्विटरवर एका व्यक्तीने ट्रोल केले होते. तसा मुद्दा ट्रोलिंगचा आहे असेही म्हणता नाही येणार. आणि स्वराही आता ट्रोलिंगला हँडल करण्यामध्ये एक्स्पर्ट बनली आहे. कारण बऱ्याच वेळा तिला बऱ्याच गोष्टींवरून ट्रोल केले जातेच. If you have bold and different thought than mass public then be ready to get trolled…सध्या असंच होतं वरचेवर.
How appropriate is it to judge a person by the nature of his work? Swara Bhaskar gave correct answer to trolls
यावेळी एका युजरने स्वराची तुलना आपल्या घरातल्या कामाला बाईसोबत केली. यावर अतिशय शांतपणे उत्तर देत स्वरा म्हणते, ‘आशा करते की, तुम्ही तुमच्या घरातल्या कामवाल्या बाईला अतिशय आदराने आणि सन्मानाने वागवत असाल आणि नक्कीच ती सुंदर असेल.’
नमाज पढणाऱ्यांसमोर ‘जय श्री राम’च्या घोषणांवर स्वरा भास्कर म्हणते – मला हिंदू असण्याची लाज वाटते!
आपण अशा समाजामध्ये राहतो जिथे, अमुक अमुक एक काम कमी दर्जाचे आणि मोठ्या एमएनसी कंपन्यांमध्ये वगैरे काम करणे हे उच्च दर्जाचे असे मानले जाते. कष्ट करून, प्रामाणिकपणे काम करून दोन वेळच पोट भरणाऱ्या लोकांचे खरंतर कौतुक करायला हवे. कमी साधनसामुग्री मध्ये ते अतिशय सुखी आणि आनंदी जीवन जगत असतात. एखाद्याच्या कामाच्या स्वरुपावरुन त्या व्यक्तींना खालच्या दर्जाचे किंवा उच्च दर्जाचे म्हणून संबोधणे हे चुकीचेच आहे.
मागे ‘सर’ या मूव्हीमध्ये काम केलेली अभिनेत्री तिलोत्तमा शोम हिलादेखील सोशल मिडीयावर ट्रोल करण्यात आले होते. सर या सिनेमांमध्ये तिने हाउसमेड ची भूमिका साकारली होती. जी तिने अतिशय उत्कृष्ट रीत्या साकारली होती. त्या भूमिकेसाठी तिला मोठे अवॉर्डस देखील मिळाले होते. त्यावेळी तिला एका युजरने ट्रोल केले असता तिनेही असेच सडेतोड उत्तर दिले होते.
How appropriate is it to judge a person by the nature of his work? Swara Bhaskar gave correct answer to trolls
महत्त्वाच्या बातम्या
- पालकमंत्री सतेज पाटील यांच्या विरोधात कोणता उमेदवार भाजप उभा करणार?
- आंदोलनात सहभागी झालेल्या सांगली मधील वाहक कर्मचाऱ्यांच्या मृत्यूमूळे खळबळ
- पक्षी निरीक्षण : रंकाळा तलाव पक्षी प्रेमींना खुणावतेय, विविध 43 प्रजातींची नोंद
- आता अमृता फडणवीस यांनीही नवाब मलिकांना पाठवली मानहानीची नोटीस, म्हणाल्या- ४८ तासांत माफी मागा!
- सावरकर प्रेमींच्या संतापानंतर नाशिकच्या साहित्य संमेलन गीतात झाला बदल!!