मेक्सिकोमध्ये बसचा मोठा अपघात झाला आहे. यात किमान १९ जणांचा मृत्यू झाला. हे सर्व शुक्रवारी धार्मिक स्थळाकडे जात होते. त्यानंतर बस घरावर आदळून दुर्घटना घडली. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. मध्य मेक्सिकोमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, सर्व बळी पश्चिमेकडील मिचोआकन राज्यातील रहिवासी आहेत. हे लोक कॅथोलिक चर्चमध्ये जात होते. स्थानिक टेलिव्हिजनशी बोलताना अधिकाऱ्याने सांगितले की, “दुर्दैवाने 19 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.” Horrific road accident in Mexico, speeding bus collided with home, 19 people died
वृत्तसंस्था
सेंट्रल मेक्सिको : मेक्सिकोमध्ये बसचा मोठा अपघात झाला आहे. यात किमान १९ जणांचा मृत्यू झाला. हे सर्व शुक्रवारी धार्मिक स्थळाकडे जात होते. त्यानंतर बस घरावर आदळून दुर्घटना घडली. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. मध्य मेक्सिकोमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, सर्व बळी पश्चिमेकडील मिचोआकन राज्यातील रहिवासी आहेत. हे लोक कॅथोलिक चर्चमध्ये जात होते. स्थानिक टेलिव्हिजनशी बोलताना अधिकाऱ्याने सांगितले की, “दुर्दैवाने 19 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.”
मिळालेल्या माहितीनुसार, महामार्गावरून धावणारी ही बस एका घरावर आदळल्याने हा अपघात झाला. इतर 32 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे, त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे. बसचे ब्रेक निकामी झाल्याचे स्थानिक माध्यमांनी सांगितले. जे त्यावेळी स्थानिक धार्मिक स्थळाच्या दिशेने जात होते. मात्र, स्थानिक अधिकाऱ्यांनी या अपघातामागील कारण अद्याप सांगितलेले नाही. स्थानिक मीडियाने दुर्घटनाग्रस्त बसचे काही फोटो प्रसिद्ध केले आहेत, जे सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.
Horrific road accident in Mexico, speeding bus collided with home, 19 people died
महत्त्वाच्या बातम्या
- नवाब मलिक यांचा आरोप अनिल देशमुखांप्रमाणे मलाही गोवण्याचा प्रयत्न, पोलीस आयुक्त आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे तक्रार करणार
- मेंदूचा शोध व बोध : मेंदूची अंतर्गत क्लिष्ट रचना एखाद्या भव्य कारखान्यासारखीच
- लाईफ स्किल्स : शरीरसंपदेसाठी आहारामध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने वाढवा
- वर्षा गायकवाड : पहिलीपासून द्वैभाषिक अभ्यासक्रम लागू करण्याचे निर्देश ,विद्यार्थ्यांची इंग्रजी भाषेची अडचण दूर होणार
- विज्ञानाचे डेस्टीनेशन्स : संगणकही शिकणार आता माणसाची भाषा