विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोनानंतर जनजीवन सुरळित झाल्यानंतर जानेवारी महिन्यात भारताच्या बेरोजगारीच्या दरात मोठी घट आहे. मार्च 2021 नंतर प्रथमच बेराजगारी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. सध्या बेरोजगारीचा दर 6.57 टक्यांवर आली आहे.Hopeful, India’s Unemployment Declines, Report by Center for Monitoring Indian Economy
स्वतंत्र थिंक टॅँक असलेल्या सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या अहवालात ही आकडेवारी देण्यात आली आहे. भारतातील शहरी भागात बेरोजगारीचा दर 8.16 टक्के आहे. ग्रामीण भागातील बेरोजगारी यापेक्षा खूपच कमी म्हणजे 5.84 टक्के आहे.
अहवालानुसार डिसेंबरमध्ये बेरोजगारीचा दर 7.91 टक्के होता. त्यावेळी शहरी भागातील दर 9.30 ग्रामीण भागात 7.28 टक्के होता. तेलंगणामध्ये सर्वात कमी म्हणजे 0.7 टक्के बेरोजगारी आहे. हरियाणामध्ये सर्वात जास्त म्हणजे 23.4 टक्के आहे.
गुजरातमध्ये बेरोजगारी दर (1.2 टक्के), मेघालय (1.5 टक्के) आणि ओडिशा (1.8 टक्के) का स्थान रहा। हरियाणानंतर राजस्थानमध्ये 18.9 टक्के बेरोजगारी आहे. 2021 मध्ये बेरोजगारांची संख्या 5.3 कोटी होती. त्यामध्ये महिलांची संख्या मोठी आहे.
सेंटर फॉर मॉनिटरिंग इकॉनॉमीचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश व्यास यांनी सांगितले की, डिसेंबरमध्ये साडेतीन कोटी लोक रोजगार शोधत होते. त्यामध्ये 80 लाख महिला होत्या.
Hopeful, India’s Unemployment Declines, Report by Center for Monitoring Indian Economy
महत्त्वाच्या बातम्या
- ज्येष्ठ अभिनेते रमेश देव कालवश; ब्लॅक अँड व्हाईट ते डिजिटल सिनेमापर्यंत अनुभवला चित्रपटसृष्टीचा प्रवास!!
- अर्थसंकल्पावर उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले –क्रिप्टोकरन्सीवरील करामुळे मुंबईचे मोठे नुकसान
- मोठी बातमी : संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना ईडीकडून अटक, १०३४ कोटींच्या घोटाळ्याचा आरोप
- राष्ट्रगीताचा अपमान : मुंबई न्यायालयाने ममता बॅनर्जींना बजावले समन्स, २ मार्चला हजर राहण्याचे निर्देश