• Download App
    ओडिशात महाकाय हत्तींना मधमाशा थेट जंगलात पिटाळणार। Honeybees will attack on Elephants

    ओडिशात महाकाय हत्तींना मधमाशा थेट जंगलात पिटाळणार

    वृत्तसंस्था

    भुवनेश्वर : हत्तींना मनुष्यवस्तीत प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी ओडिशा सरकारने मधमाशांची मदत घेण्याचे ठरविले आहे. ओडिशामध्ये अलीकडच्या काळात हत्तीच्या हल्ल्यांत मोठ्या प्रमाणावर मनुष्यहानी होत आहे. मधमाशांच्या मदतीने हत्तींना पिटाळून लावण्याचा असा प्रकल्प दक्षिण आफ्रिका तसेच उत्तराखंड, कर्नाटकमध्येही यशस्वी ठरला आहे. अथमलिक वनविभागाच्या परिसरात तीन गावातील रहिवाशांसह यासंदर्भात बैठक घेण्यात आली. त्यात, गावकऱ्यांनी प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांना दिले. Honeybees will attack on Elephants

    सप्टेंबर ते मार्च या कापणीच्या हंगामात प्रामुख्याने हत्ती मनुष्यावर हल्ले करतात. त्यामुळे, या काळात हा प्रकल्प राबविला जाईल. जंगलाच्या परिसरात तसेच सर्वधारणपणे हत्ती ज्या रस्त्याने मनुष्यवस्तीत शिरतात, त्या रस्त्यावर मधमाशांच्या पेट्या ठेवल्या जातील. त्याचप्रमाणे, या पेट्यांना वायर घट्ट बांधली जाईल. हत्ती या मार्गावरून जातील आणि या वायरवर पाय ठेवतील तेव्हा पेटी उघडेल. त्यातील मधमाशा हत्तींवर हल्ला करून त्यांना पुन्हा जंगलात माघारी पाठवतील. चंडका अभयारण्य, सिमिलीपाल राष्ट्रीय अभयारण्यातील हत्तींना बंगळूरमधील भारतीय विज्ञान संस्थेच्या मदतीने रेडिओ कॉलरही लावले जातील.



    चेक देताय? काळजी घ्या!

    चेकमधील नावात अथवा रकमेत फेरफार करून गैरप्रकार (फ्रॉड) करण्याच्या घटना वरचेवर घडताना दिसून येतात. यावर एक प्रभावी उपाय म्हणून ‘पॉझिटीव्ह पे’ ही सुविधा नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) विकसित केली असून, नुकतीच म्हणजे एक सप्टेंबर २०२१ पासून रिझर्व्ह बँकने ती लागू केली आहे.

    यातील प्रमुख वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत-

    रु. ५०,००० वरील रकमेचा चेक देण्यासाठी ही सुविधा खातेदारांना आता वापरता येईल. रु. ५०,००० ते रु. ५ लाखांपर्यंतच्या रकमेचा चेक देताना ही सुविधा वापरणे ऐच्छिक स्वरुपाची असेल; मात्र रु. ५ लाख व त्यावरील रकमेचा चेक देताना ही सुविधा वापरणे बंधनकारक असणार आहे.

    यानुसार चेक देताना चेकवरील पेयीचे नाव, रक्कम, तारीख व चेक नंबर हा तपशील चेक देण्यापूर्वी बँकेला कळवावा लागणार आहे.

    आपण दिलेल्या तपशिलाची नोंद बँकेकडे घेतली जाईल व ज्यावेळी चेक बँकेकडे ‘पेमेंट’साठी येईल, त्यावेळी आपण दिलेला तपशील व चेकवरील तपशील तंतोतंत जुळला तरच बँककडून चेकचे पेमेंट केले जाईल; अन्यथा चेक परत केला जाईल. तसे झाल्यास चेक रिटर्न चार्जेस खातेदाराच्या खात्यावर नावे टाकण्यात येतील.

    जर रु. ५ लाख अथवा त्यावरील रकमेचा चेक देताना अशी माहिती खातेदाराने बँकेस दिली नसेल, तर चेकचे पेमेंट होणार नाही (खात्यात पुरेशी शिल्लक असली तरी); शिवाय चेक रिटर्न चार्जेसही भरावे लागतील.

    चेकचा तपशील देण्यासाठी आपण नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग यांचा वापर करू शकता. बँकांनी आता हा पर्याय त्याच्या साईटवर; तसेच मोबाईल अॅपवर देऊ केलेला आहे.

    आपण जर नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग यासारखी सुविधा वापरत नसाल, तर प्रत्यक्ष बँकेत जाऊन हा तपशील देणे गरजेचे आहे.

     ‘पॉझिटीव्ह पे’ची पूर्तता केली नसल्यास चेक पेमेंट बाबतची तक्रार करता येणार नाही. त्यामुळे आधीच खबरदारी घ्यायला हवी.

    थोडक्यात, यापुढे चेकचे पेमेंट आणखी सुरक्षित झाले आहे, असे म्हणता येईल.

    Honeybees will attack on Elephants

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!