विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : परदेशी देणग्या घेणाऱ्या शैक्षणिक, सांस्कृतिक संस्थांना केंद्रीय गृहमंत्रालयाने दणका दिला आहे. सुमारे सहा हजार संस्थांचे एफसीआरए परवाने रद्द करण्यात आले आहेत. परदेशातून निधी मिळवित काही संस्थांकडून देशविरोधी कारवाया आणि भारताची प्रतिमा मलिन केली जात असल्याचे उघड झाले होते. त्यानंतर गृह मंत्रालयाने कारवाई सुरू केली आहे.Home Ministry slams 6,000 institutions, restricts foreign donations to educational and cultural institutions
इंडियन इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (दिल्ली), जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ, इंडियन मेडिकल असोसिएशन आणि नेहरू स्मारक संग्रहालय व ग्रंथालयासारख्या जवळपास ६ हजार संस्थांचा एफसीआरए परवाना शनिवारी रद्द करण्यात आला आहे.
परदेशी देणग्या (नियमन) कायदा (एफसीआरए) संबंधित संकेतस्थळानुसार, ज्या संस्थांचे एफसीआरए परवाने रद्द करण्यात आले आहेत, त्यामध्ये इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र, भारतीय लोक प्रशासन संस्था, लालबहादूर शास्त्री मेमोरियल फाउंडेशन, लेडी श्री राम कॉलेज फॉर वुमन, दिल्ली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि ऑक्सफॅम इंडिया या संस्थांचा समावेश आहे.
एफसीआरए अंतर्गत नोंदणीकृत अशासकीय संस्था (एनजीओ), आणि त्यांच्या संलग्न संस्थांचे नियमन करणाºया केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अधिकाºयांच्या म्हणण्यानुसार या कायद्यांतर्गत नोंदणी शनिवारी बंद झाली आहे. त्यामध्ये या संस्थांची संख्या २२ हजारांवरून १६ हजारवर आली आहे.
कोणत्याही संस्था आणि एनजीओला विदेशी देणग्या मिळविण्यासाठी एफसीआरए नोंदणी करणे अनिवार्य आहे. शुक्रवारपर्यंत अशा संस्थांची संख्या २२ हजार ७६२ होती. मात्र अनेक संस्थांचा परवाना रद्द केल्याने ही संख्या आता १६ हजार ८२९ वर आली आहे. या संस्थांना अर्ज करण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात आला होता. मात्र या संस्था अर्ज सादर करू शकल्या नाहीत
Home Ministry slams 6,000 institutions, restricts foreign donations to educational and cultural institutions
महत्त्वाच्या बातम्या
- स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीनिमित्त ७५ कोटी लोक घालणार सूर्यनमस्कार, केंद्रीय अनुदान आयोगाचे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही सहभागी होण्याचे आवाहन
- राजकारणासाठी अर्थकारण पणाला, अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशात केली मोफत वीजेची घोषणा
- मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखरने दिली जॅकलीनसोबतच्या संबंधांची कबुली
- सरकारी बस चालविण्याच्या हट्टासाठी तरुणीने परिवहन मंत्र्यांची गाडीच अडवली