• Download App
    Arvind Kejriwal मोठी बातमी! अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध

    Arvind Kejriwal : मोठी बातमी! अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध होणार गुन्हा दाखल

    Arvind Kejriwal

    गृह मंत्रालयाने EDला दिली परवानगी


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : Arvind Kejriwal  दिल्लीत २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची तयारी जोरात सुरू आहे. आम आदमी पक्ष, काँग्रेस आणि भाजप, या सर्व पक्षांचे नेते एकमेकांविरुद्ध विधाने करत आहेत. मात्र, निवडणुकीच्या तयारीदरम्यान, माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यासाठी वाईट बातमी आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरण चालवण्याची परवानगी दिली आहे.Arvind Kejriwal



    गेल्या वर्षी मार्चमध्ये अरविंद केजरीवाल यांना अटक केल्यानंतर, ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांच्याविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. आता, अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की गृह मंत्रालयाने उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत केजरीवाल यांच्यावर खटला चालवण्यासाठी ईडीला आवश्यक ती मान्यता दिली आहे. केजरीवाल यांना या प्रकरणात केवळ त्यांच्या वैयक्तिक क्षमतेमुळेच नव्हे तर ते आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक असल्याने आरोपी बनवण्यात आले आहे.

    केजरीवालांवर काय आरोप आहे?
    दिल्लीतील उत्पादन शुल्क घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार अरविंद केजरीवाल असल्याचे ईडीने म्हटले आहे. केजरीवाल यांच्यावर मंत्री, आप नेते आणि इतरांशी संगनमत करून हा घोटाळा केल्याचा आरोप आहे. ईडीच्या म्हणण्यानुसार, गुन्ह्याच्या वेळी केजरीवाल आपचे प्रमुख होते, त्यामुळे त्यांना आणि त्यांच्या पक्षाला दोषी ठरवले जाईल आणि त्यांच्यावर खटला चालवला जाईल आणि शिक्षा केली जाईल.

    दिल्लीत ५ फेब्रुवारी रोजी निवडणूक

    ५ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय राजधानी दिल्लीत विधानसभा निवडणुका होत असताना अरविंद केजरीवाल यांच्यासाठी ही वाईट बातमी आली आहे. निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार, दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान ५ फेब्रुवारी रोजी होणार आहे आणि या मतदानाचे निकाल ८ फेब्रुवारी रोजी जाहीर केले जातील.

    Home Ministry gives permission to ED to file case against Arvind Kejriwal

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!