म्हणाले- केजरीवालांनी फक्त भ्रष्टाचार केला आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Home Minister Shah केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी दिल्लीतील नरेला येथे एका सभेला संबोधित केले. यावेळी अमित शहा यांनी आम आदमी पक्षाला ‘बेकायदेशीर उत्पन्न असणार पक्ष’ म्हटले. गृहमंत्री अमित शहा यांनी आरोप केला की पक्ष मते मिळविण्यासाठी खोटे बोलतो आणि त्यांच्या १० वर्षांच्या सत्तेत अरविंद केजरीवाल यांनी भ्रष्टाचाराशिवाय काहीही केले नाही.Home Minister Shah
नरेला विधानसभा मतदारसंघातील एका जाहीर सभेला संबोधित करताना अमित शाह यांनी केजरीवाल आणि आम आदमी पक्ष (आप) यांच्यावर दिल्लीत राहणाऱ्या पूर्वांचली लोकांचा अपमान केल्याचा आरोप केला. शाह म्हणाले, “केजरीवाल फक्त मते मिळविण्यासाठी खोटे बोलले. ‘आप’ म्हणजे बेकायदेशीर कमाईचा पक्ष.
गृहमंत्र्यांनी सांगितले की, ‘आप’चे कुशासन ८ फेब्रुवारी रोजी भाजप सत्तेत आल्यावर संपेल. केजरीवाल, तुमचे सरकार लवकरच जाणार आहे आणि भाजप सत्तेत येणार आहे. तसेच “आपल्या संविधानाच्या अंमलबजावणीपासून या ७५ वर्षात, आपल्या देशवासीयांनी लोकशाहीला खोलवर मजबूत करण्यात मदत केली आहे. याच लोकशाहीमुळे एका गरीब चहा विक्रेत्याचा मुलगा देशाचा तिसऱ्यांदा पंतप्रधान बनला आहे.” ही अशी राज्यघटना आहे ज्याच्यामुळे एका गरीब आदिवासीची मुलगी द्रौपदी मुर्मू ‘राष्ट्रपती’ पदावर विराजमान झाली आहे.
अमित शाह हे नरेला येथील भाजप उमेदवार राज करण खत्री यांच्यासाठी प्रचार करत होते. ७० सदस्यांच्या दिल्ली विधानसभेसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे आणि ८ फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर होतील.
Home Minister Shah calls AAP a party with illegal income
महत्वाच्या बातम्या
- विद्वत्त शिरोमणी पंडित देवदत्त पाटील यांना रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे अभिवादन मानपत्र समर्पित!!
- Jammu and Kashmir : प्रजासत्ताक दिनी जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरीचा कट उधळला
- लंडनमध्ये भारतीय हाय कमिशन समोर आंदोलन करणाऱ्या खलिस्तानवाद्यांना तिथल्या तिथे भारतीयांचे चोख प्रत्युत्तर!!
- Republic Day : प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये दिसले भारताच्या सशस्त्र दलांचे शक्तिप्रदर्शन