लोकशाहीचे भविष्य जनता ठरवेल. असंही म्हणाले आहेत.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीची देशभरात तयारी सुरू झाली असून, सर्वच राजकीय पक्ष राज्यांमध्ये आपली पकड मजबूत करत आहेत. या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मध्य प्रदेशात ग्वाल्हेर दौऱ्यावर पोहोचले. येथे त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात पक्षाच्या नेत्यांची प्रदीर्घ बैठक घेतली, ज्यामध्ये त्यांनी निवडणुकीची रणनीती बनवली. यानंतर अमित शाह एका कार्यक्रमात सहभागी झाले, जिथे जाहीर सभेला संबोधित करताना अमित शाह यांनी 2024 च्या निवडणुकीस लोकशाहीचे महापर्व असल्याचे म्हटले.Home Minister Amit Shah termed 2024 elections as a festival of democracy
- भाजप अधिवेशात अमित शाह म्हणाले, ‘ज्यांचे ध्येय कुटुंबासाठी सत्ता बळकावणे आहे, ते…’
कुशाभाऊ ठाकरे इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर येथील राष्ट्रोदय अमृत काल येथे जाहीर सभेला संबोधित करताना अमित शाह म्हणाले की, यावर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत जनतेचे मतदान लोकशाहीचे भवितव्य ठरवेल. त्यामुळे 2024 हे वर्ष लोकशाहीचे महापर्व असून ते जनसंपर्काच्या माध्यमातून साजरे होत आहे.
ते पुढे म्हणाले की, भारताचे नागरिक म्हणून मतदान करणे आणि जनमत तयार करणे ही जनतेची जबाबदारी आहे. यासोबतच त्यांनी आपल्या मतावर जातीवाद, घराणेशाही, तुष्टीकरण आणि भ्रष्टाचाराच्या पैशाचा प्रभाव पडू देऊ नये, असे आवाहन केले.