वृत्तसंस्था
श्रीनगर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. अमित शहा यांच्या जम्मू-काश्मीरच्या तीन दिवसांच्या दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. आज येथील सभेला संबोधित करताना ते म्हणाले की, जम्मूच्या जनतेवर अन्यायाचा काळ संपला आहे,Home Minister Amit Shah addresses rally in Jammu and Kashmir he is on a three day visit
आता तुमच्यावर कोणीही अन्याय करू शकणार नाही, हे सांगण्यासाठी मी आज जम्मूमध्ये आलो आहे. इथून सुरू होणाऱ्या विकासाच्या पर्वात व्यत्यय आणणारे त्रासदायक आहेत, पण विकासाचे पर्व कोणीही विस्कळीत करू शकणार नाही.
गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, एक काळ असा होता की जम्मू-काश्मीरमध्ये म्हणायला पाच पण चारच वैद्यकीय महाविद्यालये होती, परंतु आज येथे सात नवीन वैद्यकीय महाविद्यालये स्थापन झाली आहेत. पूर्वी येथून 500 विद्यार्थी एमबीबीएस करू शकत होते, आता 2,000 विद्यार्थी येथे एमबीबीएस करू शकतील.
कलम 370 हटवल्याने लाखो लोकांना अधिकार मिळाले
अमित शहा यावेळी म्हणाले की, “पूर्वी जम्मूमध्ये शीख, खत्री, महाजनांना जमीन खरेदी करण्याचा अधिकार नव्हता. तिथून इथे आलेल्या निर्वासितांना हक्क नव्हते, वाल्मिकी आणि गुर्जर बंधूंना हक्क नव्हते. आता माझ्या या बांधवांना भारतीय राज्यघटनेतील सर्व अधिकार मिळणार आहेत.
ते म्हणाले की, 5 ऑगस्ट 2019 रोजी पंतप्रधान मोदींनी ऐतिहासिक निर्णय घेत कलम 370 आणि 35A रद्द केले. यामुळे जम्मू -काश्मीरच्या लाखो लोकांना त्यांचे हक्क मिळाले. तसेच, आता भारतीय संविधानाचे सर्व अधिकार येथील सर्व लोकांना दिले जात आहेत.
विरोधकांवर हल्ला चढवताना अमित शहा म्हणाले की, काल हे तीन कुटुंबीय मला प्रश्न विचारत होते की, तुम्ही काय देणार? भाऊ, मी एक खाते घेऊन आलो आहे की मी काय देईन. पण 70 वर्षे जम्मू-काश्मीरमध्ये तीन घराण्यांनी राज्य केले, तुम्ही काय दिले याचा हिशेब घेऊन या. आज जम्मू-काश्मीर हिशेब मागत आहे.
Home Minister Amit Shah addresses rally in Jammu and Kashmir he is on a three day visit
महत्त्वाच्या बातम्या
- औरंगाबादच्या संभाजीनगर नामांतरवरून किरीन रिजिजुंचे संकेत , म्हणाले – जे करायचय ते वेळेवर करू
- ड्रॅगनची पुन्हा कुरापत : चीनचा नेपाळच्या हुमला जिल्ह्यावर ताबा, संपूर्ण परिसराला कुंपण घालून स्थानिकांनाही येण्यापासून रोखले
- औरंगाबाद: हीच ‘शिवशाही’ का? मुख्यमंत्री आले- न्यायालयाचं उद्घाटन केलं-अन्यायावर मात्र मौन!दरोडा-बलात्कार प्रकरणाची साधी दखलही नाही…
- निजामशाहीची पालखी वाहण्यात मोठा आनंद; गोपीचंद पडळकर यांची संजय राऊतांवर टीका