• Download App
    बांकेबिहारी मंदिरात रंगांची होळी आज सुरू होणार । Holi of colors will start today in Bankebihari temple

    बांकेबिहारी मंदिरात रंगांची होळी आज सुरू होणार

    वृत्तसंस्था

    बनारस : लोकांचे लाडके श्री बांकेबिहारी महाराज हे चांदीच्या सिंहासनावर विराजमान होऊन रंगभरणी एकादशीपासून जगमोहनात शुभ्र वस्त्र परिधान करून भाविकांसह होळी खेळणार आहेत. या परंपरेनंतर मंदिरात रंगांची होळी सुरू होईल. Holi of colors will start today in Bankebihari temple

    मंदिराचे सेवक आचार्य प्रल्हाद वल्लभ गोस्वामी यांच्या म्हणण्यानुसार, रंगभरणी एकादशीला श्री बांके बिहारीसाठी शुद्ध भगवा रंग बनवला जातो. सर्वप्रथम सोन्या-चांदीच्या पिचकारीतून पांढरे वस्त्र परिधान केलेल्या ठाकुरजींवर रंग ओततात, त्यानंतर होळीची पारंपारिक सुरुवात होते. त्यांनी सांगितले की, मंदिरात पळसापासून तयार केलेले रंग, चंदन आणि अबीर गुलाल यांनी होळी खेळली जाते.

    आचार्य प्रल्हाद वल्लभ गोस्वामी यांनी सांगितले की ही होळी रंगभरणी एकादशीपासून सुरू होते आणि पौर्णिमेच्या संध्याकाळी समाप्त होते. मंदिराचे सेवक रघू गोस्वामी यांनी सांगितले की, धुलीवंदनाच्या दिवशी ठाकुरजी भक्तांना रंगवत नाहीत, तर गुलाबी वस्त्र परिधान करून सोन्याच्या सिंहासनावर बसून आपल्या भक्तांना होळी खेळताना पाहतात. त्याच दिवशी सकाळी मंदिराच्या सेवेद्वारे परिसरात चौपई (भ्रमण) काढली जाते.



    ठाकूर श्री बांके बिहारी मंदिरासोबतच राधावल्लभ, राधादामोदर, राधाश्याम सुंदर, राधारमण मंदिर, राधा गोपीनाथ, राधासेन बिहारी, मदन मोहन मंदिर, यशोदानंदन धाम, गोदाहरीदेव दिव्य देश आदी मंदिरांमध्ये पळसाचे रंग वापरले जाणार आहेत.

    होळीच्या सणात ठाकुरजींना चाट, जिलेबी, थंडाईचा खास भोग दिला जातो. सुंठवड्यासह पकौडी, दालपकौडी, दहीबडा, गुजिया, , खाजा, समोसा, आलुगोला आदी पदार्थ बिहारीजींना अर्पण केले जातात. केशर, बदाम, काजू, पिस्ता, खसखस, खरबूज, बडीशेप, काळी मिरी, गुलकंद, दूध मिश्रित थंडाई देवाला अर्पण केली जाते.

    रंगभरणी एकादशीनिमित्त दरवर्षी राधावल्लभ मंदिरातून काढण्यात येणारी पारंपारिक प्रिया-प्रियतमची रंगीली होळी मिरवणूक आज, १४ मार्च रोजी दुपारी १ वाजता मंदिरातून निघेल. मिरवणुकीत प्रियतमच्या सुसज्ज रथावर स्वार होऊन भक्तांसोबत होळी खेळण्यासाठी प्रिया शहरभर फिरणार आहे. शहरातील प्रमुख मार्गांवरून मंदिर परिसरात मिरवणुकीची सांगता होईल.

    Holi of colors will start today in Bankebihari temple

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Pink e rickshaw महिलांसाठी महिलांद्वारे संचालित ‘पिंक ई-रिक्षा’!

    West Bengal : पश्चिम बंगालला बांगलादेशचे लाइट व्हर्जन बनवले; सुकांता मजुमदार यांचा ममता बॅनर्जींवर आरोप

    Murshidabad : मुर्शिदाबाद हिंसेत वडील-मुलाच्या हत्येप्रकरणी चौथी अटक; आरोपींनी मृताच्या घराची तोडफोड केली