• Download App
    ममता खुर्ची शोधत आल्या, पवारांनी हात धरून खुर्ची ऑफर केली, पण "सॉरी" म्हणून त्या निघून गेल्या!! Holding Mamata Banerjee's hand, Pawar urged her to sit on the chair

    ममता खुर्ची शोधत आल्या, पवारांनी हात धरून खुर्ची ऑफर केली, पण “सॉरी” म्हणून त्या निघून गेल्या!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री “इंडिया” आघाडीच्या बैठकीत आज पत्रकार परिषदेपूर्वी खुर्ची शोधत आल्या. शरद पवारांनी त्यांचा हात पकडून त्यांना आपली खुर्ची ऑफर केली. पण त्यांना “सॉरी” म्हणून त्या निघून गेल्या. हे मानापमान नाट्य इंडिया आघाडीच्या पत्रकार परिषदेत घडले!! Holding Mamata Banerjee’s hand, Pawar urged her to sit on the chair

    “इंडिया” आघाडीतल्या पहिल्या फळीतल्या सगळ्या नेत्यांना विशिष्ट खुर्च्या राखीव होत्या. परंतु, ममता बॅनर्जींना त्यांची राखीव असलेली खुर्ची सापडलीच नाही. हमारी सीट किधर है?, असे दोन-तीन वेळा म्हणत त्या सर्व नेत्यांसमोर आल्या. काही नेते उभे राहून त्यांना नमस्कार कर्ते झाले. ममतांनीही त्यांना प्रति नमस्कार केला, पण हमारी सीट किधर है? असे त्या विचारतच राहिल्या. त्यांना अखेरपर्यंत त्यांची खुर्ची मिळू शकली नाही. शेवटी शरद पवारांनी ममता बॅनर्जींचा हात पकडला आणि त्यांना स्वतःची खुर्ची ऑफर केली. पण शरद पवारांना त्या “सॉरी” म्हणून निघून गेल्या.

    तशाही ममता बॅनर्जी या “इंडिया” आघाडीतल्या पहिल्या फळीतल्या नेत्या आहेत. त्यामुळे त्यांचे नाव समन्वय समितीत नाही. सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, उद्धव ठाकरे, अरविंद केजरीवाल, एम. के. स्टालिन या पहिल्या फळीतल्या नेत्यांची नावे या समन्वय समितीत नाहीत.

    मात्र या समन्वय समितीत शरद पवारांचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. समन्वय समितीचे नेतृत्व गांधी घराण्याचे निकटवर्ती काँग्रेसचे नेते आणि संघटन सचिव के. सी. वेणूगोपाल यांच्याकडे आहे. पवारांनी स्वतःची खुर्ची ममतांना ऑफर करणे आणि त्यांनी “सॉरी” म्हणून निघून जाणे याला वर उल्लेख केलेली राजकीय पार्श्वभूमी आहे!!

    Holding Mamata Banerjee’s hand, Pawar urged her to sit on the chair

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Union Cabinet : कोटा ग्रीनफील्ड विमानतळाला केंद्राच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी; 1507 कोटी रुपयांचे बजेट दिले

    CP Radhakrishnan : उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक- NDA उमेदवार राधाकृष्णन यांचा अर्ज दाखल; मोदी पहिले प्रस्तावक

    Prasad Lad : प्रसाद लाड म्हणाले- बेस्ट निवडणुकीत ठाकरे ब्रँडचा करेक्ट कार्यक्रम झाला