जवळपास दोन दशकांपासून 16 क्रमांकाची जर्सी परिधान करणारा श्रीजेश ज्युनियर हॉकी संघाच्या राष्ट्रीय प्रशिक्षकाची भूमिका स्वीकारणार आहे
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : हॉकी इंडियाने बुधवारी महान गोलरक्षक पीआर श्रीजेशची ( PR Sreejesh ) १६ क्रमांकाची जर्सी निवृत्त करण्याचा निर्णय घेतला. नुकत्याच पार पडलेल्या पॅरिस गेम्समध्ये देशाला सलग दुसरे ऑलिम्पिक पदक जिंकून देण्यात या स्टार खेळाडूने महत्त्वाची भूमिका बजावली. यानंतर त्यांनी निवृत्ती जाहीर केली.
हॉकी इंडियाचे सरचिटणीस भोलानाथ सिंह यांनी ही घोषणा केली की, जवळपास दोन दशकांपासून 16 क्रमांकाची जर्सी परिधान करणारा 36 वर्षीय श्रीजेश ज्युनियर हॉकी संघाच्या राष्ट्रीय प्रशिक्षकाची भूमिका स्वीकारणार आहे. ते म्हणाले, “श्रीजेश आता ज्युनियर संघाचा प्रशिक्षक बनणार आहे आणि आम्ही वरिष्ठ संघासाठी 16 क्रमांकाची जर्सी निवृत्त करत आहोत. आम्ही कनिष्ठ संघासाठी 16 क्रमांकाची जर्सी निवृत्त करत नाही आहोत.”
भारताने स्पेनचा 2-1 असा पराभव करत कांस्यपदक जिंकले आणि यासह श्रीजेशने हॉकीला अलविदा केला. श्रीजेश दीर्घ काळापासून भारतीय हॉकी संघाचा महत्त्वाचा सदस्य आहे. श्रीजेशने पॅरिस ऑलिम्पिकमध्येही चमकदार कामगिरी केली आणि प्रतिस्पर्धी संघासमोर भिंतीसारखा उभा राहिला. स्पेनविरुद्धच्या कांस्यपदकाच्या लढतीतही श्रीजेशने अखेरच्या क्वार्टरमध्ये शानदार सेव्ह करत त्यांना आघाडी घेण्यापासून रोखले. अशा प्रकारे संघाने श्रीजेशला विजयासह निरोप दिला.
Hockey India took a big decision in honor of PR Sreejesh
महत्वाच्या बातम्या
- Sheikh Hasina : शेख हसीना यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल!
- Saket Gokhale : ‘टीएमसी’ खासदार साकेत गोखले यांच्या अडचणीत वाढ!
- Arvind Kejriwal : न्यायालयाकडून अरविंद केजरीवालांच्या न्यायालयीन कोठडीत 2 सप्टेंबरपर्यंत वाढ!
- S Jaishankar :अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत एस जयशंकर यांचे वक्तव्य, म्हणाले…